कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटने जगाला पुन्हा मोठ्या संकटात ढकलले आहे. जगभरात खळबळ उडालेली असताना एका वैज्ञानिकाने धक्कादायक दावा करून आणखी एक खळबळ उडवून दिली आहे. डब्ल्यूएचओने या नव्या व्हेरिअंटला 'ओमीक्रॉन' नाव दिले आहे. हा व्हायरस वेगाने म्युटेट होतो, तसेच डेल्टापेक्षा सातपट जास्त वेगाने पसरत असल्याने चिंता वाढली आहे.
लंडनस्थित यूसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटमधील एका शास्त्रज्ञाचा दावा त्याहून खतरनाक आहे. कोरोनाचा हा व्हेरिअंट पहिल्यांदा कुठून आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणत्यातरी HIV/AIDS रुग्णाला कोरोनाची लागण झाली असावी, त्याला इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड व्यक्तीपासून क्रोनिक इन्फेक्शन झाले असेल. आणि या एड्स रुग्णापासून इतर हा व्हायरस पसरू लागला असेल. आफ्रिकी देशांमध्ये आधीही अशाप्रकारचे रुग्ण सापडले आहेत, अशी शक्यता या शास्त्रज्ञाने व्यक्त केली आहे.
हा व्हेरिअंट जर 30 वेळा म्युटेट होत असेल तर चिंतेची बाब आहे. अल्फा, बीटा आणि डेल्टा प्रकारांच्या तुलनेत हा व्हेरिअंट रुग्णांना जास्त संक्रमित करू शकतो. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि हाँगकाँग, इस्रायल आणि बेल्जियममध्ये काही रुग्ण आढळले आहेत. कोरोना लस या व्हेरिअंटवर परिणामकारक आहे की नाही यावर Pfizer-BioNtech ने म्हटले आहे की ते या प्रश्नाचे उत्तर येत्या दोन आठवड्यांत देऊ शकतील.
ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोरचे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले की, 'ओमिक्रॉन' अधिक भयानक असल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. या व्हायरसविरुद्ध लस किती प्रभावी आहे हे येत्या दोन आठवड्यांनंतरच कळेल. आफ्रिकन देशांव्यतिरिक्त, हा व्हेरिअंट आता हळूहळू इतर देशांमध्ये पसरत आहे. आता या प्रकाराशी लढण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आणि बूस्टर डोस देण्याची वेळ आली आहे.
संबंधित बातम्या..
CoronaVirus Updates: नव्या कोरोना व्हेरिअंटवर लस कंपन्या काय म्हणाल्या? जग भितीच्या छायेत