बीजिंग :चीनमध्ये पुन्हा काेराेना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. चीनमध्ये ४६ नवे रुग्ण आढळले असून त्यात सर्वाधिक २० रुग्ण दक्षिणेकडील फुजियान प्रांतामध्ये आढळले आहेत. हे सर्व रुग्ण परदेशातून चीनमध्ये दाखल झाले आहेत, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आराेग्य आयाेगाने दिली. संसर्ग राेखण्यासाठी या भागात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
आयाेगाने दिलेल्या माहितीनुसार, फुजियान प्रांतातील पुतियानमध्ये काेराेनाचे २० नवे रुग्ण आढळले. तर एक रुग्ण जवळच्याच कुआनझाेउ भागात आढळला. सर्व नवे रुग्ण परदेशातून आलेले आहेत. त्यांच्यात काेराेनाचा डेल्टा विषाणू आढळला आहे. या भागात संसर्ग राेखण्याचा आटाेकाट प्रयत्न अधिकारी करीत आहेत. तज्ज्ञांचे एक पथक पुतियान येथे पाठवित असल्याचे आयाेगाने सांगितले.
सुविधा झाल्या बंद
- पुतियान भागात बस, रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच चित्रपटगृह, बार व इतर सार्वजनिक सुविधादेखील तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत.
- चीनमध्ये आतापर्यंत ९ लाख ५१ हजार नागरिकांना काेराेनाचा संसर्ग झाला असून ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे.