सेशेल्स - कोरोना विषाणूच्या एकामागून एक येत असलेल्या लाटांमुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त झालेले आहे. कोरोनाच्या या महासाथीपासून बचावासाठी सध्या लस हा एकमेव पर्याय मानवजातीसमोर आहे. त्यामुळे सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधातील लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात आहे. (Coronavirus in Seychelles ) मात्र आफ्रिका खंडातील सेशेल्स या देशात लसीकरणानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने लोक पुन्हा एकदा कोरोना लसीबाबत चिंता वाढली आहे. जगात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक लोकांचे लसीकरण हे सेशेल्समध्येच झाले आहे. (Corona patients continue to grow in Seychelles, despite high vaccination, WHO concerned)
मात्र या लसीकरणानंतरही येथे कोरोनाने डोके वर काढले आहे. ७ मे पर्यंत या देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण हे दुप्पट झाले आहे. त्यामुळे जगभरातील तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार येथे गेल्या आठवडाभरापासून कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या दुप्पट झाली आहे. तसेच नव्या रुग्णांचा आकडा हा २ हजार ४८६ पर्यंत पोहोचला आहे. धक्कादायक बाबत म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांपैकी तब्बल ३७ टक्के लोकांनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
सेशेल्समधील ५७ टक्के लोकांना चीनमध्ये विकसित झालेली सिनोफार्म आणि उर्वरित लोकांना भारतात उत्पादित झालेली कोविशिल्ड ही लस देण्यात आळी होती. दरम्यान, भारतामध्येही बहुतांश लोकांा कोविशिल्ड ही लसच दिली जात आहे. अशा परिस्थितीत सेशेल्समध्ये वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण ही भारतासाठीची चिंतेची बाब आहे. मात्र दिलासादायक गोष्ट म्हणजे, लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींपैकी कुणाचाही कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेला नाही. एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या सेशेल्समध्ये कोरोनाविरोधातील लसीकरण अभियान वेगाने चालवले जात होते. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आता येथील शाळा आणि क्रीडास्पर्धा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच लोकांच्या भेटीगाठींवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. सेशेल्समध्ये बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनाच्या माध्यमातून होतो. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करून पर्यटनस्थळे पुन्हा एकदा खुली करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. दरम्यान सेशेल्समध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा दक्षिण आफ्रिकेत सापडलेला बी.१.३५१ हा व्हेरिएंट सापडला होता. या व्हेरिएंटवर कोविशिल्ड ही लस अधिक परिणामकारता दाखवू शकलेली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने या लसीच्या वापराला स्थगिती दिली होती.
दरम्यान, कोरोनाच्या लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. तसे कुठल्याही परीक्षणाविना लस काम करत नाही, असे म्हणता येणार नाही. सेशेल्समध्ये वाढत असलेल्या रुग्णसंख्येचे परीक्षण करण्यात येत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.