रियो दि जानिरो - कोरोना विषाणूपासून बचावासाठी कोरोनावरील लस हे आजच्या घडीचे सर्वात प्रभावी हत्यार आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील लस घेणे हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. (Corona vaccination in Brazil) ब्राझीलमधीलही एका व्यक्तीने कोरोनापासून बचाव होण्यासाठी लस घेण्याची तयारी केली. मात्र त्याचा कोरोना लसीकरणाचा प्लॅन वेगळ्याच लेव्हलचा होता.आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कोरोना होता कामा, नये अशी या व्यक्तीची इच्छा होती. त्यामुळे त्याने केवळ अडीच महिन्यांमध्ये कोरोनावरील लसीचे एकूण पाच डोस घेतले. मात्र ही बाब कुणालाही कळली नाही. (He took five doses of three different vaccines in two and a half months to prevent coronavirus)
ब्राझीलची राजधानी असलेल्या रियो दि जानिरोमध्ये ही घटना घडली आहे. अधिकृत माहितीनुसार एका व्यक्तीने देशात कोरोनाची लस आल्यानंतर मे महिन्यापासून लस घेण्यास सुरुवात केली. जून महिन्यापर्यंत त्याने पाच लसी घेतल्या होत्या. जुलैमध्ये तो सहावा डोस घेण्याच्या प्रयत्नात होता. त्यादरम्यान, त्याची चालाखी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. या व्यक्तीने १२ मे रोजी फायझर लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर ५ जून रोजी अॅस्ट्राजेनिकाचा दुसरा डोस घेतला. १७ जून रोजी त्याने पुन्हा एकदा कोरोनाव्हॅकचा तिसरा डोस घेतला. त्यानंतर फायझर लसीचा पुढचा डोस त्याने ९ जुलैला घेतला. तर २१ जुलैला त्याने कोरोना व्हॅकचा अजून एक डोस घेतला.
आधी अधिकाऱ्यांना वाटले की, या व्यक्तीची गोंधळात टाकणारी लसीकरणाची माहिती रेकॉर्डच्या गडबडीमुळे झाली असावी. मात्र नंतर या प्रकरणाचा तपास रियोमधील आरोग्य विभागाकडून करण्यात आला. तेव्हा समजले की, हे सारे काही रजिस्ट्रेशनमधील गोंधळामुळे झाले आहे. एवढेच नाही तर या व्यक्तीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या रेकॉर्डमध्येही खूप गडबद आहे. लसीकरण स्टेशनला या व्यक्तीला कुठल्या लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला गेला आहे, याची माहिती सापडत नाही आहे. दरम्यान, नेमकी चूक कुठे झाली, याचा तपासा अद्यापही सुरू आहे.
ब्राझीलमध्ये लसींचा तुटवडा असताना आणि लाखो लोक पहिल्या डोसची वाट पाहत असताना ब्राझीलमधील लसीकरणाचा हा गोंधळ समोर आला आहे. देशामध्ये लसींचा तुटवडा असताना या व्यक्तीने मात्र तीन वेगवेगळ्या लसींचा पाच डोस घेतले आहेत. एवढेच नाही तर आश्चर्याची बाब म्हणजे लसीकरणानंतरही ही व्यक्ती अगदी ठणठणीत फिरत आहे.