वॉशिंग्टन : अमेरिकेची औषध निर्माता कंपनी मॉडर्नाने त्यांची कोरोनावरील लस (Corona Vaccine) मोठ्या व्यक्तींसोबतच १२ वर्षांच्या मुलांवरही परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. 12 वर्षांवरील मुलांना अमेरिकेत फायझरची लस दिली जात आहे. यामुळे तिथे आणखी एका लसीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या दोन कंपन्यांशिवाय अद्याप जगभरातील एकाही कंपनीने लहान मुलांसाठीच्या लसीचा दावा केलेला नाही. तर कोव्हॅक्सिनचा दुसरा आणि तिसरा चाचणी टप्पा सुरु आहे. (Moderna says its vaccine is highly effective in 12 to 17 years childrens.)
फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांसोबत केंद्र सरकारची बोलणी सुरु आहेत. भारतात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशावेळी या दोन कंपन्यांच्या लसी १२ वर्षांवरील मुलांना मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात लहान मुलांना इन्फ्लुएन्झाची लस देण्याची मागणी करण्यात आली आहे. विविध राज्यांनी तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
Video: खूशखबर! रशियन Sputnik V चे भारतात उत्पादन सुरु; वर्षाला 10 कोटी डोस बनणार
कोरोना लसींचा तुटवडा जागतिक स्तरावर आजही कायम आहे. भारतासह अनेक देश त्यांच्या नागरिकांना लस देण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशावेळी अमेरिका आणि कॅनडामध्ये गेल्याच आठवड्यापासून फायझरची लस 12 वर्षांवरील मुलांना देण्यास सुरुवात झाली आहे.
मॉडर्ना पुढील महिन्याच्या सुरुवातीला 12 ते 17 वयोगटावरील चाचणीचा अहवाल अमेरिकेला सोपविणार आहे. या वयोगटातील 3700 मुलांवर कोरोना लसीची चाचणी घेण्यात आली आहे. त्यांना लस दिलेल्या ठिकाणी सूज, डोकेदुखी आणि थकवा अशी सामान्य लक्षणे दिसली. मॉडर्नाच लस ही पुढील वर्षी भारताला मिळण्याची शक्यता आहे.