वॉशिंग्टन : एकीकडे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या लसींचे १.५ कोटी डोस नष्ट करण्यात आले आहेत. (1.5 crore doses of Johnson & Johnson corona vaccines destroyed)अमेरिकास्थित बाल्टमोर येथील जॉन्सन अँड जॉन्सनच्या कारखान्यातील कामगारांनी जॉन्सन अँड जॉन्सन आणि अॅस्ट्राझेनेका लसीतील घटक एकत्र मिसळल्याने लसींचे १.५ कोटी डोस नष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेच्या अन्न व औषधी प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी ही मानवी चूक असल्याचे म्हटले आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने असा दावा केला की, इर्मजन्ट बायोसोल्यूशन या कंपनीकडून हा कारखाना चालविला जातो.
Corona vaccine :... म्हणून जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनावरील लसींचे १.५ कोटी डोस केले नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 3:36 AM