शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

corona vaccine : कोरोनाविरोधात विकसित झाली स्वस्त आणि मस्त लस, सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंविरोधात ठरणार प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 2:55 PM

corona vaccine update : कोरोनाविरोधात एक अशी लस विकसित करण्यात आली आहे जी नव्या आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या अशा सर्व कोरोना विषाणूंविरोधात प्रभावी ठरू शकते.

वॉशिंग्टन - गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूविरोधात (coronavirus)  प्रभावी औषधोपचार आणि लस विकसित करण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. (corona vaccine update) याकाळात कोरोनाविरोधातील काही लसीही विकसित झाल्या आहेत. मात्र त्या अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाविरोधात एक अशी लस विकसित करण्यात आली आहे जी नव्या आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या अशा सर्व कोरोना विषाणूंविरोधात प्रभावी ठरू शकते. तसेच या लसीची किंमत केवळ एक डॉलर असेल, अशी प्राथिमिक माहिती आहे. (Cheap and Effective vaccine developed against coronavirus, effective against all types of corona viruses)

एका प्रायोगिक कोरोना लसीच्या प्राण्यांवर केलेल्या प्राथमिक चाचणीमधून समाधानकारक माहिती समोर आली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, ही लस कोरोना विषाणूच्या सध्याच्या आणि भविष्यातील रूपांपासून बचाव करेल. युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाच्या संशोधकांनी डुकरांना बाधित करणारा कोरोना विषाणू पोरकिन एपिडेमिक डायरिया व्हायरस (पीईडीव्ही) मॉडेलच्या माध्यमातून डुकरांना आजारी पडण्यापासून वाचवले आहे.   

पीईडीव्ही डुक्करांमध्ये संसर्ग  फैलावण्याचे काम करतो. त्यामुळे त्यांना जुलाब लागतात. त्यांना उलट्या होतात. तसेच ताप येतो. ही बाब वराहपालन करणाऱ्या जगभरातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान, नव्याने विकसित झालेली लस ही कोरोना विषाणूविरोधात एकमेव लस विकसित करण्याचा मार्ग मोकळा करू शकते. यामध्ये त्या विषाणूंचा सुद्धा समावेश आहे ज्यामुळे याआधीही जागतिक साथीचा धोका निर्माण झाला होता. तसेच त्या कोरोना विषाणूंचाही समावेश आहे ज्यांच्यामुळे सर्दी खोकला होत असतो.  संशोधकांच्या मते या लसीचे अनेक फायदे आहेत. जागतिक लसीकरण मोहिमेत येणारे अडथळे या लसीच्या माध्यमातून पार करता येतील. तसेच या लसींची साठवण आणि वाहतूक करणे सोपे असेल. एवढेच नाही तर जगातील दुर्गम भागातही ही लस पाठवता येईल. सध्या लस निर्मिती करत असलेल्या कारखान्यांचा वापर या लसीच्या निर्मितीसाठी करता येईल. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या