शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Corona Vacine : 20 वर्षांपासूनच्या शोधाची कमाल; रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:50 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 746,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील  कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 746,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 20,528,680 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 13,449,101 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. याच दरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतीन यांनी कोरोना लस तयार झाल्याची घोषणा केली आहे. 

रशियाने या लसीला ‘स्पुटनिक व्ही’ असे नाव दिले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. यानंतर आता रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच करण्यात आली आहे. Russian Direct Investment Fund म्हणजेच RDIF ने कोरोना लसीसंदर्भात sputnikvaccine.com अशी वेबसाईट लाँच केली आहे. फेसबुकवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या SputnikV या लसीबाबत वेबसाईटवर सर्व माहिती देण्यात आली आहे. 

रशियाने ही लस म्हणजे तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या शोधांचा परिणाम असल्याचा दावा केला आहे. तसेच लसीमध्ये जे घटक वापरण्यात आले आहेत. ते स्वत:ला कॉपी (रेप्लिकेट) करू शकत नाहीत असा दावाही संशोधकांनी केला आहे. या कोरोना लसीसाठी कोणाकोणाची पार्टनरशिप आहे याची देखील माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. तसेच लसी संदर्भातील प्रश्न-उत्तरांसाठी एक कॉलमही देण्यात आला आहे. जिथे लोकांना प्रश्न विचारता येतील आणि शंकांचं निरसन देखील करता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनावर लस कोण पहिल्यांदा विकसित करते, याची जगात स्पर्धा सुरू असतानाच रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतीन यांनी लस तयार झाल्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर ती लस आपल्या मुलीलाही देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जगातील ही पहिली कोरोना लस आहे असा दावा त्यांनी केला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने मात्र या लसीला मान्यता मिळण्यासाठी सुरक्षेच्या डेटाचा आढावा घेणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.

लसीच्या विकासासाठी आर्थिक मदत करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रेव्ह यांनी सांगितले की, या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी बुधवारी सुरू करण्यात आली आहे. या लसीचा प्रभाव दोन वर्ष राहतो असा दावा, रशियाच्या आरोग्य खात्यानं केला आहे. रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ही नोंदणी सशर्त करण्यात आली आहे. या लसीचे उत्पादन सुरू असताना त्याच्या चाचण्याही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

भयंकर! धावत्या बसने अचानक घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 27 जण जखमी

"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र

"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी

बंगळुरू पेटलं! शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक

कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो

लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात

बापरे! बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाDeathमृत्यूmedicinesऔषधं