शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

Corona Vaccine : जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण करणार अमेरिका, भारतासह आशियाई देशांना मिळणार लस   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 8:25 AM

Corona Vaccine : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी जागतिक स्तरावर कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी या लसींचे वितरण जूनच्या अखेरपर्यंत करण्याचे ठरविले होते.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन (Joe Biden) यांनी सोमवारी जागतिक स्तरावर आशियाई देशांना कोरोना व्हायसरच्या 5.5 कोटी लसी (Covid Vaccine) देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारत आणि बांगलादेश यासारख्या आशियाई देशांना 1.6 कोटी लसी देण्यात येणार आहेत. (us president joe biden announces allocation plan 55 million vaccine to india asian countries)

याआधी अमेरिकेने कोरोनाची 2.5 कोटी लसी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे हे मिळून आतापर्यंत आठ कोटी लसींचे वितरण बायडन प्रशासनाने जाहीर केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी जागतिक स्तरावर कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी या लसींचे वितरण जूनच्या अखेरपर्यंत करण्याचे ठरविले होते.

व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, 'राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी जगभरातील कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी आपला लढा सुरू ठेवला असून संपूर्ण जगाला लसी देण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याअंतर्गत आम्ही आमच्या स्थानिक पुरवठ्यांमधून लसी देण्याची योजना आखली आहे. राष्ट्राध्यक्षांनी जूनअखेरपर्यंत आठ कोटी लसींचे वाटप करण्याचे म्हटले आहे. याचबरोबर, व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, आठ कोटी लसींपैकी 75 टक्के कोव्हॅक्स मोहिमेद्वारे वितरित केल्या जातील, तर 25 टक्के लस संक्रमणाच्या मोठ्या घटनांचा सामना करणाऱ्या देशांना पुरवल्या जातील.

आतापर्यंत जगात 17.92 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागणआता जगातील कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत. रविवारी जगात 2 लाख 95 हजार 229 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर या दरम्यान 3 लाख 25 हजार 447 लोकांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जगात 17.92 कोटीहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून त्यापैकी 38.82 लाख लोकांचा मृत्यू झाला, तर 16.38 कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

अमेरिकेत 90 टक्के लसीकरणदरम्यान, कोरोनाचा परिणाम सर्वाधिक अमेरिकेत झाला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेत 90 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. येथील लोक आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरू शकतात.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन