चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं तोंड वर काढलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारने झिरो कोविड धोरण स्वीकारून अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. लोकांना घरातच राहण्यास सांगितले जात आहे. सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. परंतु लोक आता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सगळ्यामध्ये चीनच्या लोकांमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन मशीन खरेदी करण्याची चिंता निर्माण झाली आहे. लोक ते खरेदी करून त्यांच्या घरात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सने एका चिनी आर्थिक फर्मने दावा केला आहे की जर चीनी सरकारने आपल्या झिरो-कोविड धोरणानुसार लादलेले निर्बंध हटवले तर चीनमधील 1.2 कोटी घरांमधील लोकांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन मशीनची आवश्यकता असेल. अशी परिस्थिती तिथे आधीच दिसून येत आहे. लोक तेथे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन मशीन खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात गुंतले आहेत.
500 डॉलर्समध्ये व्हेंटिलेटर्सकाही चिनी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी व्हेंटिलेटरसाठी 500 डॉलर्स पर्यंत खर्च केले आहेत. यासोबतच त्यांना ऑक्सिजन मशीनसाठी 100 डॉलर्स पर्यंत खर्च करावा लागला आहे. चीनमध्ये कोरोनाबाबत दहशतीचे वातावरण असल्याचेही लोकांचे म्हणणे आहे. तेथील रुग्णालये, दवाखाने रुग्णांनी भरलेले असतात.
रुग्णसंख्या वाढलीदरम्यान, चीनमध्ये कोरोनाची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत आणि रविवारी सुमारे 40,000 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. बीजिंगमध्ये सलग पाचव्या दिवशी कोरोना विषाणूचे सुमारे 4,000 रुग्ण आढळले आहेत. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की सोमवारी 39,452 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 36,304 लोकांमध्ये कोणतीही लक्षणं आढळली नसल्याचे सांगण्यात आलेय.