शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

Corona Virus : कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये रुग्णालयात वेटिंग, मृतदेहांचा ढीग; स्मशानात रांगा, परिस्थिती भीषण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 5:51 PM

China Corona Virus : चीनमधील अनेक रुग्णालयांत डॉक्टर कमी आणि रुग्णांची संख्या जास्त अशी समस्या पाहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती बिघडत आहे. चीनमध्ये फक्त रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर्स, औषधांची मोठी कमतरता नाही तर डॉक्टर आणि मेडिकल स्टाफचा देखील तुटवडा आहे. चीनी रिपोर्टमध्ये हा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. चीनमध्ये मोठ्या संख्येने मेडिकल स्टाफ हा संक्रमित झाला आहे. त्यामुळेच ते परत रुग्णालयात येण्याची आशा ही कमी आहे, 

चीनी मीडियातील रिपोर्टनुसार, चीनमधील अनेक रुग्णालयांत डॉक्टर कमी आणि रुग्णांची संख्या जास्त अशी समस्या पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे चीनमधील हेल्थ एक्सपर्ट लोकांना माध्यमांच्या मार्फत रुग्णालयातील गर्दी वाढवू नका असं आवाहन करण्यात येत आहे. संक्रमित झाल्यानंतर स्वत: ला घरामध्ये आयसोलेट करा. घरामध्येच फ्लूवरची औषधं घेऊन उपचार करा असं सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चीनमध्ये औषधांचा तुटवडा पाहायला मिळत आहे. मागणी वाढल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. 

चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी शिथिल करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. संक्रमित लोकांना इब्रुप्रोफेन आणि एसिटामिनोफेन सारखं सामान्य औषध देखील मिळत नाही. चीनने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एकही बेड उपलब्ध नसल्याने जमिनीवर रुग्णांना ठेवून उपचार केले जात आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढल्याने शवागृहही भरली आहेत. मृतदेहांचे ढीग पाहायला मिळत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे.

कोरोना पसरताच पुन्हा आधीचीच चूक करतोय चीन; जगाला महागात पडू शकते 'ही' लपवा-छपवी

चीनने यावेळी कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा लपवण्यासाठी आता नवीन पद्धत शोधून काढली आहे. आपली वेगळी गाईडलाईन तयार केली आहे. श्वासासंबंधीत आजाराने रुग्णांचा मृत्यू झाला तरच कोरोनाने मृत्यू झाल्याचं मानलं जाईल असं त्यामध्ये म्हटलं आहे. तसेच इतर गोष्टींचा त्यामध्ये समावेश नाही. चीनचं हे संकट जगासाठी येणाऱ्या काळात कसं संकट बनू शकतं. यावर वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक आर्टिकल छापण्यात आलं आहे. यामध्ये तसेच चीनचं सरकार हे आकडे लपवण्यासाठी ओळखलं जातं असं म्हटलं आहे. तसेच रुग्णांची नेमकी संख्या, मृतांचा आकडा हे सर्व कन्फ्यूजन असल्याचं म्हटलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन