बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे आणखी २२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील बळींची संख्या आता ३११९ झाली आहे. चीनमध्ये ८०,७०० लोकांना संसर्ग झाला आहे. हुबेईमध्ये गत काही दिवसांत संसर्ग होणाऱ्या नागरिकांची संख्या घटत आहे.चीनमध्ये ४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी जे नवे रुग्ण समोर आले ते सर्व वुहानमधील होते. डिसेंबरमध्ये याच भागात पहिला रुग्ण आढळून आला होता.
सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, जानेवारीत या प्रांतात लावण्यात आलेले प्रतिबंध सरकार हटवू शकते. या प्रतिबंधामुळे हुबेईमध्ये जवळपास ५.६ कोटी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
कोरोनाच्या धास्तीने इटली बंदरोम : कोरोनाचा जगभरातील जनजीवनावरील परिणाम आता अधिक स्पष्ट जाणवू लागला आहे. इटलीमध्ये संसर्ग रोखण्यासाठी सरकारने १.५ कोटी लोकसंख्येच्या उत्तर इटलीमध्ये ये-जा बंद केली आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ३६६ झालीआहे. अंतर्गत मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जे कोणी या बंदचे उल्लंघन करील त्याला तीन महिने तुरुंगवास अथवा २०६ यूरो दंड आकारला जाईल. संसर्ग झालेल्या लोकांची संख्या २४ तासांत वाढून १२०० झाली आहे. इटलीमधील तुरुंगात संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या नव्या नियमांविरुद्ध कैद्यांनी हंगामा केल्याने वाद झाला. यात एका कैद्याचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.तामिळनाडूतील पर्यटक अडकले
‘ए सारा’ या लक्झरी क्रूझ जहाजातून इजिप्तमधील नाईल नदीतून फेरफटका मारण्यासाठी तामिळनाडूतील सालेम येथून गेलेले १४ पर्यंटक गेल्या मंगळवारपासून ‘ए सारा’ या लक्झरी क्रूझवर अडकून पडले आहेत. या लक्झरी क्रूझ जहाजाने नाईल नदीकाठच्या लक्झर शहरापाशी नांगर टाकला असता त्यातील १३ कर्मचारी व ३३ प्रवाशांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाले. कोरोना रुग्णांना अलेक्झांड्रिया येथील इस्पितळात हलविण्यात आले आहे. क्रूझ जहाज तेथेच थांबविण्यात आले असून त्यातील कोणालाही १४ दिवस बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. क्रूझवर विविध देशांतील एकूण १७१ पर्यटक होते. क्रूझवरील भटारखाना बंद झाल्याने त्यांची जेवणाची पंचाईत होत आहे. अडकलेल्या भारतीय पर्यटकांनी इजिप्तमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून मूळ गावी फोन करून कुटुंबियांनाही माहिती दिली आहे.
ग्रँड प्रिन्सेस जहाज ऑकलँड बंदरावर येणारअमेरिकेतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम आणि आॅकलँडचे महापौर लिबी स्काफ यांनी स्पष्ट केले आहे की, १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय या जहाजावरील प्रवाशांना जनतेमध्ये जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. या जहाजावर ५४ देशांचे ३५०० लोक आहेत. या जहाजाला पूर्व सॅनफ्रान्सिस्कोच्या आॅकलँड बंदरात उभे करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
फ्रान्समध्ये बळींची संख्या १९फ्रान्समध्ये कोरोना बळींची संख्या १९ झाली आहे. १००० पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास येथे प्रतिबंध लावण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर कोरियाने आपल्या सीमा बंद केल्या असून हजारो लोकांना वेगळे ठेवले आहे. शेकडो विदेशी नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बांगलादेशमधील समारंभ रद्दबांगलादेशात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. शेख मुजीब-उर-रहमान यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त होणारा शताब्दी समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभर चालणाºया या समारंभाची सुरुवात १७ मार्च रोजी ढाका येथे नॅशनल परेड ग्राऊंडवरून होणार होती.अफवांवर विश्वास ठेवू नका -मोदीकोरोना विषाणूच्या फैलावाबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोनाच्या संसर्गाबद्दल डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोमवारी केले आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी परस्परांना हस्तांदोलन करणे टाळावे. त्यापेक्षा एकमेकांना नमस्कार करावा. देशात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या स्थितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडून एका बैठकीत सोमवारी माहिती घेतली.