बीजिंग : चीनमध्ये कोरोना व्हायरसने (कोविद-१९) आणखी ३८ जणांचा बळी घेतला असला तरी देशात या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण खाली आहे. या आजाराने चीनमध्ये आतापर्यंत एकूण २,९८१ लोक मरण पावले आहेत, असे चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसने ३,१०० पेक्षा जास्त जणांचा बळी घेतला असून, वेगाने पसरणाºया या रोगाला रोखण्यासाठी देश आटोकाट प्रयत्न करीत आहे.३ मार्चपर्यंत चीनमध्ये कोविद-१९ ने २,९८१ जणांचे प्राण घेतले असून, एकूण ८०,२७० जणांना त्याची लागण झाली आहे. ही माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) मंगळवारी दिली. जगभर या रोगाने ३,१२३ जण मृत्युमुखी पडले असून, ९१,७८३ जणांना त्याची लागण झालेली आहे. मंगळवारी क्षीनजियांग आणि प्रांतात ११९ नवे रुग्ण सापडले आहेत.त्यात हुबेई प्रांत व त्याची राजधानी वुहानमधील ११५ रुग्ण आहेत. कोरोना व्हायरसचे मुख्य केंद्रच वुहान आहे. हुबेईच्या बाहेर फक्त चार रुग्ण मंगळवारी समोर आले. ३ फेब्रुवारी रोजी हुबेईत ८९० रुग्ण नोंद झाले होते, असे एनएचसीने म्हटले.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने (कोविद-१९)नं ३८ दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 6:08 AM