संयुक्त राष्ट्र : जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा (Delta variant) कहर वाढू लागला आहे. हा व्हायरस वेगाने पसरू लागला असून जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने हा व्हेरिअंट ९६ देशांत पसरल्याचे सांगितले आहे. तसेच येत्या महिन्यांत कोरोनाचे (corona virus) हे नवे स्वरूप जगासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा व्हेरिअंट पहिल्यांदा भारतात सापडला होता. मंगळवारपर्यंत हा डेल्टा व्हेरिअंट ९६ देशांमध्ये सापडला आहे. (corona virus Delta variant spread in 96 countries: WHO)
डब्ल्यूएचओने ही आकडेवारी जाहीर केली आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो, कारण व्हायरसच्या या रुपाची ओळख पटविण्यासाठी जीनोम सीक्वेंसिंग क्षमता या मर्यादित आहेत. अनेक देशांनी डेल्टा व्हेरिअंटमुळे कोरोना संक्रमण वाढत असल्याचे कळविले आहे. या व्हेरिअंटचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये वाढू लागले आहेत. यामुळे पुढील काही काळात डेल्टा व्हेरिअंट जगामध्ये थैमान घालण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. (WHO warns of third coronavirus wave in Europe)
डब्ल्यूएचओने गेल्याच आठवड्यात म्हटले होते की, आतापर्यंत जेवढे कोरोनाचे व्हेरिअंट सापडलेत त्यात डेल्टा हा सर्वाधिक संक्रमक आहे. हा व्हेरिअंट कोरोना लस न घेतलेल्या लोकांमध्ये वेगाने पसरत आहे. काही देशांनी निर्बंध शिथिल केले आहेत, यामुळे जगात कोरोनाचा वेग वाढत आहे. अल्फा व्हेरिअंट १७२ देशांमध्ये, बीटा व्हेरिअंट १२० देशांमध्ये आणि गॅमा व्हेरिअंट ७२ देशांमध्ये पसरला आहे.
युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारावृत्तसंस्था रॉयटरनुसार डब्ल्यूएचओने युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओचे युरोपविभागाचे प्रमुख हंस क्लुगे यांनी सांगितले की, गेल्या दहा आठवड्यांपासून युरोपमध्ये सुरु असलेला कोरोना रुग्णांचा घसरता आकडा आता संपणार आहे. जर लोकांनी नियंत्रण ठेवले नाही, काळजी घेतली नाही तर आणखी एक लाट टाळता येणार नाही, असे ते म्हणाले आहेत. डब्ल्यूएचओचे महानिदेशक टेड्रोस यांनी गुरुवारी सांगितले की, प्रत्येक देशाने सप्टेंबरपर्य़ंत किमान १० टक्के लोकांचे लसीकरण करावे. जोवर प्रत्येक देशातून कोरोना संपत नाही तोवर आपण ही महामारी संपवू शकणार नाही.