वॉशिंग्टन : चीनमधील व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला. तर देशातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे कोरोना ही गंभीर समस्या बनली असून यास रोखण्याचे आव्हान जगातील सर्वच देशासमोर आहे. आता, लवकरच यावर औषध निर्माण होईल, असे दिसून येतेय.
कोरोनाच्या लढाईत जगभरातील वैज्ञानिक कामाला लागले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनावर ठोस उपाय किंवा औषध निर्माण झाले नाही. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना आज जगभरातील काना-कोपऱ्यात पसरला आहे. आता, या व्हायरसला थांबविणारे औषध लवकरच निर्माण होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
जगातील सर्वात वेगवान संगणक असलेल्या समिटच्या मदतीने अमेरिकेतील वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसवर योग्य उपचार करुन बचाव करणारेऔषध शोधले आहे. या शास्त्रज्ञांना ७७ औषधांची ओळख पटली आहे, जे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखू शकतात. यापासून वॅक्सीन बनविण्यास मदत मिळू शकते. वैज्ञानिकांनी ८ हजारपेक्षा जास्त औषधांची टेस्ट केल्यानंतर या ७७ औषधांची ओळख पटली आहे. ज्यामधून व्हायरसचा संसर्ग मानवजातीपासून फैलाव होण्यास थांबविण्यात येईल.
समिट काय आहे?
सुपर कॉम्प्युटरचे निर्माण जगभरातील समस्यांचं निराकरण करण्यासाठी केलंय. अमेरिकेतील ऊर्जा विभागाने २०१४ साली समिटच्या निर्मित्तीचे काम सुरू केले होते. हा सुपर कॉम्प्युटर २०० पेटाफ्लॉप की गनना करण्यासाठी सक्षम आहे. सर्वात वेगवान लॅपटॉपपेक्षाही १० लाख पटीने हा वेगवान आहे. आता, शास्त्रज्ञांचे पथक पुन्हा एकदा ७७ रसायनांची तपासणी करून कोरोनाच्या खात्म्यासाठी सर्वात उत्कृष्ट मॉडेलचे निर्माण करेल.