वॉशिंग्टन: मागील काही दिवसांपासून जगभर कोरोना (Coronavirus) आणि ओमायक्रॉन(Omicron) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोना रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची लागण असलेल्या रुग्णांचाही समावेश आहेत. दरम्यान, या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतात लसीकरण आणि बूस्टर डोसवर भर दिला जातोय. पण, आता अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासातून नवीन माहिती समोर आली आहे.
तज्ज्ञांचा सतर्क राहण्याचा इशाराअमेरिकेतील तज्ज्ञांनी डेल्टा व्हेरिएंटच्या कोरोनाच्या लाटेदरम्यान केलेल्या रिसर्चमधून समोर आलंय की, कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरात निर्माण होणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती कोरोना लसीच्या रोग प्रतिकारशक्तीपेक्षा चांगली असते, असे या अभ्यासात म्हटले आहे. पण, संशोधकांनी सावधही केले आहे. लस न घेतलेल्यांना लसीकरण झालेल्या लोकांपेक्षा हॉस्पिटलायझेशन, दीर्घकालीन परिणाम आणि मृत्यूचा धोका जास्त आहे.
लसीकरण सर्वोत्तम उपाययूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने निवेदनात म्हटले की, कोविड-19 चा व्हायरस सतत बदलत आहे. लसीकरणानंतर मिळालेली सुरक्षा आणि संसर्गानंतर मिळालेल्या सुरक्षेच्या अभ्यासात बदल झालेला पाहायला मिळत आहेत. पण, सध्या कोरोनाविरोधात लसीकरण हा एकमेव परिणामकारक उपाय आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ओमायक्रॉनपूर्वी झाला अभ्यासहा अभ्यास ओमायक्रॉन व्हेरिएंटच्ये उत्पत्तीपूर्वी म्हणजेच 30 मे ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियामधील रुग्णांवर करण्यात आला आहे. आता जगभर कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संसर्ग वाढवला आहे. लसीकरण आणि कोरोनामुळे तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे या ओमायक्रॉनने दाखवून दिले. त्यामुळे आता तज्ज्ञ या नवीन व्हेरिएंटवरही अभ्यास करत आहेत. येत्या काही काळात या नवीन व्हेरिएंटबाबत आपल्याला महत्वाची माहिती मिळू शकेल.