जगभरात कोरोना नियंत्रणात आला असला तरी चीन, हाँगकाँग आणि व्हिएतनाममध्ये कोरोनाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा स्फोट झाल्याने अनेक शहरांत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रविवारी कोरोना व्हायरसच्या एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. मात्र, आज भारतात जेवढे सापडले त्याच्या दुप्पट रुग्ण सापडल्याने चीनमध्ये खळबळ उडाली आहे.
सोमवारी चीनमध्ये कोरोना विषाणूचे 2,300 नवीन रुग्ण आढळले होते. परंतू आज मंगळवारी ही रुग्णसंख्या दुप्पटीपेक्षा जास्त वाढली आहे. आज 5,280 एवढे कोरोना रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका जिलीन प्रांताला बसला आहे. चीनमध्ये जवळपास १० शहरे आणि काऊंटीमध्ये ल़ॉकडाऊवन लावण्यात आला आहे. यामध्ये चीनचा टेक हब असलेल्या शेंझेन शहराचा देखील समावेश आहे. यामुळे तेथील सुमारे १७ दशलक्ष लोकांना घरात रहावे लागले आहे.
शांघायमध्ये शाळा, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स आणि व्यवसाय तात्पुरते बंद आहेत. बीजिंगमध्ये निवासी भागात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर, बीजिंगमधील प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे. लोकांना अत्यावश्यकतेशिवाय शहराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. चीनमध्ये प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. शेनझेन शहरात कोरोना लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर शहरात राहणारे 1.7 कोटी लोक त्यांच्या घरात बंद झाले आहेत.