बिजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणू सापातून माणसामध्ये संक्रमित झाल्याची शक्यता तेथील संशोधकांनी व्यक्त केली आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत १८ जण मरण पावले असून सुमारे ६३० जणांना त्याची लागण झाली आहे. याचे संक्रमण होऊ नये, म्हणून चीनने वुहान आणि हुआंगगांग ही दोन शहरे बंद करून टाकली आहेत. तेथील रहिवाशांना कारणाविना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. तसेच तेथील वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.वुहान आणि हुआंगगांग या दोन्ही श्हरांमध्ये बाहेरील लोकांना जायलाही सध्या परवानगी मिळणार नाही, असे तेथील सरकारने स्पष्ट केले आहे. या शहरांतील चित्रपटगृहे, दुकाने मॉल, बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.पेकिंग विद्यापीठातील संशोधक वेई जी यांंनी सांगितले की, चीनच्या खाद्यबाजारात साप, वटवाघळे, कोंबड्या, मासे, गुरेढोरे, शेळ््या-मेंढ्या, बकऱ्या बाजारात विकत मिळतात.काही पक्षी-प्राण्यांचे मांसही खाल्ले जाते. याच बाजारामध्ये सापापासून कोरोना विषाणू माणसामध्ये संक्रमित झाला असावा. यासंदर्भातील लेख जर्नल आॅफ मेडिकल व्हायरॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या विषाणूचा संसर्ग हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, जपान या देशांतील नागरिकांनाही झाला आहे.कोरोना विषाणूच्या संक्रमित होण्याचा शोध घेताना संशोधकांनी म्हटले आहे की, २००३ साली सार्सची साथ पसरली होती. त्यातील विषाणूशी कोरोनाचे साधर्म्य आहे. सार्सच्या साथीत ८४२२ जणांना संसर्ग झाला होता व ९०० जण मरण पावले होते. मात्र त्यावेळी जेवढा हाहाकार माजला तेवढा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होण्याची शक्यतानाही. (वृत्तसंस्था)भारताच्या सूचनाकोरोनाच्या संसर्गामुळे बळी गेलेल्यांमध्ये बहुतांश नागरिक वुहान व हुआंगगांग या शहरांतील असल्याने तेथील परिस्थितीवर चीन तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत.या शहरांत आवश्यकता असेल तरच जावे, अशी सूचना भारताने आपल्या नागरिकांना केली आहे. मात्र त्या शहरांत बाहेरील लोकांना तूर्त जाता येणारनाही.
कोरोना विषाणूचे सापातून संक्रमण? चीनमध्ये आतापर्यंत १८ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 4:37 AM