बांदा : इराणमध्ये अडकून पडलेल्या सिंधुदुर्ग व गोव्यातील ९ युवकांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. साहजिकच सर्व युवकांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कणकवली आमदार नीतेश राणे सातत्याने संपर्कात आहेत.दोन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग व गोव्यातील ९ युवक गोव्यातील चष्मा बनविणाऱ्या कंपनीच्या इराण येथील कारखान्यात काम करण्यासाठी गेले होते. दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी संपल्याने १४ मार्च रोजी ते भारतात परतणार होते. मात्र, सध्या इराणमध्ये कोरोना व्हायसरचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे विमान वाहतुक सेवा बंद असल्याने सर्व युवक अडकून पडले आहेत.काही दिवस नियंत्रण कक्षात ठेवणारगेले दोन दिवस इराण आरोग्य मंत्रालयाने सर्व नऊही युवकांची तपासणीसाठी केली. त्यांच्या कोरोना संदर्भात सर्व चाचण्या अहवालात रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. येत्या तीन - चार दिवसांत खास विमानातून सर्वांना भारतात आणले जाणार आहे. त्यानंतर भारतात काही दिवस त्यांना नियंत्रण कक्षात ठेवले जाणार आहे.
corona virus : इराणमधील नऊ युवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह, परतीचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 5:18 AM