वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांची संख्या ही तब्बल 17 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा लॉक़डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. वुहानमधूनच कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जातं. चीनवर असे आरोप केले जात असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेत वटवाघळांना जिवंत ठेवले जात असल्याचे समोर आले. त्यामुळे वुहानच्या प्रयोगशाळेवरील संशय अधिकच वाढला आहे.
'चायना अकादमी ऑफ सायन्स'ने मे 2017 मध्ये एक व्हिडीओ प्रसारीत केला होता. या व्हिडीओत वटवाघळांना पिंजऱ्यात ठेवले असल्याचे दिसून आले होते. वुहान प्रयोगशाळेतील नवीन बायोसेफ्टी लेव्हल 4 वरील सुरक्षा सुरू करण्यात आल्यानंतर हा व्हिडिओ जारी करण्यात आला. यामध्ये प्रयोगशाळेत एखादा अपघात झाल्यास सुरक्षा मानके काय आहेत, याची माहिती देण्यात आली होती. या प्रयोगशाळेच्या निर्माणावरून फ्रान्स सरकारसोबत झालेल्या वादविवादाबाबतही माहिती देण्यात आली. व्हिडिओमध्ये शास्त्रज्ञ वटवाघळांना किडे खायला देत असताना दिसून आले आहे.
10 मिनिटांचा व्हिडिओ वुहान प्रयोगशाळेवर आधारीत आहे. यामध्ये काही शास्त्रज्ञांच्या मुलाखतीदेखील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात वुहानच्या प्रयोगशाळेत वटवाघळे असण्याबाबत काहीही नमूद करण्यात आले नाही. मात्र, या प्रयोगशाळेत प्राण्यांना ठेवण्यात आले, असे नमूद करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ पीटर दास्जाक यांनी तर प्रयोगशाळेत वटवाघळं असल्याच्या दाव्याला कट असल्याचं म्हटलं होतं. वुहान येथील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेत विविध विषाणू आणि त्यांच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजारावर संशोधन करण्यात येते. याआधी अनेक संशोधकांनी वुहानच्या प्रयोगशाळेत वटवाघूळ ठेवल्याचा दावा केला आहे.
धोका वाढला! कोरोनानंतर 'हा' आजार तयार करतोय लंग बॉल, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणं
कोरोनानंतर रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. म्युकोरमायकोसिस शिवाय व्हाईट फंगस, यलो फंगस आणि क्रीम फंगसचा देखील समावेश आहे. काही तज्ज्ञांच्या मते व्हाईट फंगस देखील (White Fungus) धोकादायक आहे. या फंगसचा संसर्ग झाल्यास तो सर्व अवयवांवर परिणाम करू शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट फंगसला वैद्यकीय भाषेत कँडिडा (Candida) असं म्हणतात. याचा संसर्ग झाल्यास फुफ्फुसांसोबतच रक्त वाहिन्यांवरही (Blood Vessels) परिणाम होतो, हे याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. रुग्णाच्या रक्तात फंगसचा प्रवेश झाल्यावर त्यास कँडिडीमिया असं म्हणलं जातं आणि येथूनच तो धोकादायक होण्यास सुरुवात होते. एस.एन. मेडिकल कॉलेजमधील डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. आरती अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कॅंडिडीमिया फुफ्फुसांपर्यंत (Lungs) पोहोचला तर त्याला लंग बॉल (Lung Ball) असं म्हणलं जातं.