शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

Corona Virus : रशियात कोरोना बेलगाम! 24 तासांत 1000 हून अधिक मृत्यू, एक आठवड्याची पगारी सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 5:36 PM

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी पुतीन यांनी लसीकरणाच्या संथ गतीला जबाबदार धरले आहे. रशियामध्ये स्पुतनिक-व्ही लसीची उपलब्धता असूनही, येथे केवळ 35% लोकांचेच संपूर्ण लसीकरण होऊ शकले आहे. गेल्या काही आठवड्यांत येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

आता रशियामध्ये (Russia) कोरोना विषाणूचा कहर झपाट्याने वाढताना दिसत आहे. येथे गेल्या 24 तासांत 1024 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (vladimir putin) यांनी कर्मचाऱ्यांना एक आठवड्याची पगारी रजा जाहीर केली आहे. एवढेच नाही, तर नागरिकांनी जबाबदारीने पुढे यावे आणि लस घ्यावी, असे आवाहन पुतीन यांनी केले आहे. (Corona Virus In Russia)

पुतीन यांनी 30 ऑक्टोबरपासून देशभरात एक आठवड्याची पगारी सुट्टी जाहीर करण्याच्या सरकारच्या योजनेला मंजुरी दिली आहे. पुतीन म्हणाले, याचा मुख्य उद्देश लोकांचे जीवन आणि आरोग्याचे संरक्षण करणे आहे.

रशियात केवळ 35% लोकांचेच संपूर्ण लसीकरण -कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी पुतीन यांनी लसीकरणाच्या संथ गतीला जबाबदार धरले आहे. रशियामध्ये स्पुतनिक-व्ही लसीची उपलब्धता असूनही, येथे केवळ 35% लोकांचेच संपूर्ण लसीकरण होऊ शकले आहे. गेल्या काही आठवड्यांत येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

नागरिकांनी जबाबदारीने लस घ्यावी - पुतीन सातत्याने लोकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन करत आहेत. बुधवारीही त्यांनी पुन्हा एकदा नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. तसेच लोकांनी जबाबदारीने समोर यावे आणि लस घ्यावी, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. रशियात बुधवारी कोरोनाचे 34000 नवे रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत येथे 226,353 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या युरोपमधील कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाCorona vaccineकोरोनाची लसVladimir Putinव्लादिमीर पुतिन