कोरोनाच्या साथीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. अनेक देशांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. जगभरात कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोनाच्या विषाणूचा सर्वाधिक भयंकर परिणाम हा शरीरातील फुप्फुसांवर दिसून आला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे ११ टक्के रुग्णांच्या फुप्फुसांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे आणि त्यात जखमा झाल्याचे दिसून आले आहे. अध्ययनातून समोर आलेल्या माहितीनुसार हे इर्रिवसेबल होण्यासोबत काळाबरोबर खराब स्थितीतही पोहोचू शकतात.
कोविड-१९ च्या रुग्णांबाबत करण्यात आलेला अभ्यास अमेरिकन जरनल ऑफ रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. यात सांगितले की, कोविडचे रुग्ण ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्थितीत आजाराचं गांभीर्य दिसून आलं होतं आणि त्यामध्ये फायब्रोटिक लंग्स डॅमेज दिसून आलं होतं. त्याला इंटस्टिशियल लंग्स डिजीज म्हटलं जातं. अशा रुग्णांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना फॉलोअप केअर करण्याची गरज आहे.
इंटरस्टिशियल लंग्स डिजीजमध्ये अनेक प्रकारच्या साथींचा समावेश आहे. ज्यामध्ये सर्वसाधारणपणे फुप्फुसांमधील घाव म्हणून ओळखळे जाते. यामध्ये आयडोपेथिक लंग फायब्रोसिससुद्धा आहे. हे घाव झाल्याने रुग्णांना श्वास घेण्यास अडचणी येतात. आयडोपेथिक लंग फायब्रोसिसमुळे फुप्फुसामध्ये झालेले घाव हे इर्रिवसेबल असतात. सोबतच वेळेबरोबर ते अधिकच खराब होतात.