वॉशिंग्टन - अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी कोरोनाचा एक अत्यंत घातक स्ट्रेन विकसित केला आहे. या स्ट्रेनचा संसर्ग होणाऱ्यांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण हे तब्बल ८० एवढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या लॅबमधील अशाच एका कथित प्रयोगामुळे कोरोनाची साथ जगभर पसरली होती.
फ्लोरिडा आणि बोस्टनमधील संशोधकांच्या एका समुहाने विद्यापीठामधील लॅबमध्ये हे संशोधन केले आहे, दरम्यान, या संशोधनाच्या बातम्या समोर येताच तज्ज्ञांनी संशोधकांच्या या प्रयोगावर टीका केली आहे. या प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या उंदरांपैकी ८० टक्के उंदरांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा प्रयोग म्हणजे आगीशी खेळण्यासारखे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
विद्यापीठाने सांगितले की, कोरोनाचा हा स्ट्रेन ओमायक्रॉन आणि वुहानमधील मूळ विषाणूचं मिश्रण आहे. संशोधकांनी ओमायक्रॉनमधून स्पाइक प्रोटिन काढले आणि ते चीनमधील वुहान येथून कोरोनाच्या संसर्गास सुरू झाली, त्या स्ट्रेनमध्ये मिसळले. त्यानंतर त्यांनी बाधित उंदरांनी हायब्रिड स्ट्रेनवर कशी प्रतिक्रिया दिली, याचं चित्रण केलं. तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या या स्ट्रेनमध्ये ओमायक्रॉनच्या तुलनेच पाच पट अधिक संक्रामक क्षमता आहे.
हा प्रयोग फ्लोरिडा आणि बोस्टनमधील संशोधकांच्या एका टीने नॅशनल एमर्जिंग इंफेक्शियस डिजीज लेबॉरेटरीमध्ये केला. ही प्रयोगशाळा अमेरिकेतील जैविक हल्ल्यापासून खबरदारी घेणाऱ्या लॅबपैकी एक आहे. येथे कोरोना आणि इबोलासारख्या जीवघेण्या आजारांवर संसोधन सुरू आहे. दरम्यान, इस्राइल सरकारचे प्रमुख शास्त्रज्ञ शमूएल शापिरा यांनी या प्रयोगावर पूर्णपणे निर्बंध घातले गेले पाहिजेत असे सांगितले.