शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

Corona virus : 'मी एका हाऊस पार्टीमध्ये गेली अन्...'; कोरोनावर मात करणाऱ्या महिलेने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 7:47 PM

सार्वजनिक ठिकाणी खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणं चांगलं तर आहे आणि त्याची सर्वांनी अंमलबजावणी करणं देखील तितिकेच आवश्यक आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे देशभरात भीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणं चांगलं तर आहे आणि त्याची सर्वांनी अंमलबजावणी करणं देखील तितिकेच आवश्यक आहे. मात्र आता सर्वत्र अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, एखादा व्यक्ती शिंकला किंवा खोकला तर लोकांचा त्या व्यत्कीकडे बघण्याचा दृष्टीकोन सध्या बदलला असल्याचे दिसून येत आहे. एखादी व्यक्तीला शिंका आली किंवा खोकला आला म्हणजे त्याला कोरोना झाला आहे असा विचार केला जात आहे. मात्र असा विचार करणं चूकीचं आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरात राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. परंतु डॉक्टरकडे जाऊन कोणत्याही प्रकारचा उपचार न करता कोरोनाच्या आजारापासून ठणठणीत बऱ्या झाल्या आहे. या सर्व प्रकराचा त्यांनी अनुभव फेसबुकद्वारे सांगितला आहे.

एलिझाबेथ स्नायडर या महिलेचे नाव असून त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटले आहे की, मी एका हाऊस पार्टीमध्ये गेली होती. यानंतर मला कोरोनाची लागण झाली होती. तसेच या हाऊस पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांपैकी कोणीही शिंकत किंवा खोकत नसताना देखील जवळपास 40 टक्के लोकांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती.  माध्यमांद्वारे सतत हात धुवा, गर्दीतच्या ठिकाणी जाऊ नका असं आवाहन करण्यात येत होतं. मी देखील कोणाशी संपर्क न साधता 7 ते 8 दिवस एकटं राहण्याचा प्रयत्न केला. 

दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना कोरोनाची लक्षणे त्यांच्या वयानुसार, निरोगीपणानुसार दिसत होती. माझे आजारी पडलेले सगळे मित्र चाळीशी पन्नाशीचे आहेत. पण मी तीस वर्षाची आहे. आम्हाला सर्वप्रथम डोके दुखणे , मग ताप येणे, प्रचंड प्रमाणात अंगदुखी ,सांधेदुखी आणि अशक्तपणा असं होत गेलं. मला पहिल्या दिवशी १०३ ताप आला आणि नंतर १०० पर्यंत खालीही आला. काहीजणांना जुलाब होत होते. ताप गेल्यावर घसा दुखणे , घश्याला इन्फेक्शन, छाती जड होणे, श्वास घ्यायला त्रास होणे असे प्रकार होत होते. हा सगळा त्रास आम्हाला १० ते १६ दिवसाच्या कालावधीत झाला. यानंतर मी कोरोनाची तपासणी करण्याचा विचार केला. माझे COVID-19 साठी टेस्टिंग सॅम्पल सिएटल फ्लू स्टडी या संस्थेकडे तपासायला दिले. त्याचप्रमाणे माझं सॅम्पल पडताळणीसाठी किंग कौंटी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटकडेही पाठवण्यात आलं होतं. यानंतर मला सांगण्यात आले की तुम्ही दिलेले सॅम्पलमध्ये तुम्हाला कोरोना व्हायसर हा आजार झाला असल्याचे या दोन्ही तपास संस्थेकडून सांगण्यात आले. 

किंग कौंटी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या सल्ल्यांनूसार मला ताप आल्यानंतर किंवा डोकेदुखी, सांधेदुखीसारखा त्रास झाल्यानंतर योग्य उपचार करणं आवश्यक होते. तसेच गर्दीच्या ठिकाणी देखील जाण्याचे टाळण्याची गरज होती. पण असं काहीच झाले नाही. मी रुग्णालयात उपचारासाठी देखील गेली नाही. मी या आजारापासून स्वतःहूनच सुधारण्याचा प्रयत्न करत होती. तसेच पूर्वी मी इथल्या स्थानिक फ्लूची लस देखील घेतली होती.

आपल्याला फक्त सर्दी आणि ताप आला आहे असा विचार करुन लोकं गर्दीत जाऊन आजार पसरवत आहे. कोरोनाव्हायरसचा सर्वात धोकादायक लक्षण म्हणजे श्वसनाचा त्रास , मला हा झाला नाही. परंतु मी आदरम्यानच्या काळात मी दररोज Sudafed Tablets घेत होते, दिवसातून ३ वेळा नेजल स्प्रे वापरत होते आणि Neti Pot (नाक स्वच्छ करण्यासाठी चे प्युरिफाइड पाणी )चा सुद्धा वापर करत होते त्याचा मला फायदा झाला. याच्यामुळे सायनस मोकळं होऊन फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका कमी झाला. मी जे सांगत आहे तो वैद्यकीय सल्ला अजिबात नाही. तर यातून काळजी घेण्यासाठी जे जे काय मी केलंय ते फक्त तुमच्याशी शेयर करत आहे अर्थात हे सर्व उपाय किती आणि कोणत्या प्रमाणात या व्हायरसची लागण झाली त्यावर अवलंबूनसुद्धा असू शकतात.

मला असे वाटते की, मी शेअर केलेल्या अनुभवामुळे लोकं या आजारापासून स्वतःचा बचाव करू शकतील किंवा कोरोनाची थोडीही लक्षणं आढळून आल्यास तात्काळ तपासणी करून घेतील. तसेच मला वाटते की, नियमित हात धुण्यामुळे कोरोनाव्हायरसचा संसर्ग होणारच नाही याची शाश्वती नाही. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही संसर्ग झालेल्या पण लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर जास्त धोका आहे. कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाल्याने तुमचा मृत्यू होईल याची शक्यता फार कमी आहे. परंतु आपल्या परिवारातील ६० पेक्षा जास्त वयाच्या लोकांचा किंवा कमी निरोगी व्यक्तींचा जीव तुमच्यामुळे नक्कीच धोक्यात येऊ शकतो असं एलिझाबेथ स्नायडरने आपल्या अनुभवाच्या आधारे सांगितले आहे. 

योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना व्हायरस हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवू नका. लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांकडे जा आणि वैद्यकीय चाचण्या करुन घ्या. तसंच मी कोरोनातून पूर्णपणे बरी झाले असून आता माझ्या दैनंदिन कामांना सुरुवात केली आहे, असेही एलिझाबेथ स्नायडरने सांगितले आहे. 

दरम्यान, करोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत असतानाच भारताला मोठं यश मिळालं आहे. करोना विषाणू शरीरातून विलग करणारा भारत जगातला पाचवा देश ठरला आहे. यापूर्वी चीन, जपान, थायलंड आणि अमेरिकेने हे यश मिळवलं होतं. जगभरात आतापर्यंत ५ हजारपेक्षा जास्त जणांचा करोनामुळे जीव गेला आहे, तर जवळपास दीड लाख लोक यामुळे बाधित आहेत. भारतात ८३ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर दोन जणांचा मृत्यूही झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाAmericaअमेरिकाIndiaभारतSocial Mediaसोशल मीडिया