जिनिव्हा : कोरोनाची साथ आटोक्यात येण्याची शक्यता धूसर होत चालली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रिसिस यांनी म्हटले आहे. चीनमधूनच या साथीचा फैलाव झाला असे म्हणण्यासारखा निश्चित पुरावा अद्याप मिळालेला नाही तसेच गेल्या काही महिन्यांत चीनशी काहीही संपर्क न झालेल्या देशांतही ही साथ फैलावताना दिसत आहे. चीनमध्ये बळींची संख्या २३४५वर पोहोचली आहे. तसेच त्या देशात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ७६,२८८ तर जगातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या ७७,०००पेक्षा अधिक झाली. द. कोरियामध्ये कोरोनाचे आणखी १४२ रुग्ण आढळून आले.
कोरोनाच्या चीनबाहेरही वाढत्या संसर्गाने चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 2:26 AM