शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

CoronaVaccine News : "अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या 4 लशी फेल होण्याची शक्यता"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 9:14 PM

अमेरिकेने लवकरात लवकर कोरोना लस तयार करण्यासाठी ऑपरेशन वॉर्पस्पीड सुरू केले आहे. आतापर्यंत अमेरिकेने सहा संभाव्य कोरोना लशींवर अब्जावधी रुपये खर्च केले आहेत.

वॉशिंग्टन - कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. जगातील अनेक देशांत कोरोनावरील लस तयार करण्यासाठी वैज्ञानिक कंबरकसून प्रयत्न करत आहेत. मात्र, अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांना सल्ला देणाऱ्या एक्सपर्ट्सच्या एका मुख्य गटाने, ज्या कोरोना लशींचे सरकार समर्थन करत आहे, त्यांपैकी चार लशी फेल ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. या चारही लशी सध्या लेट-स्टेज ट्रायलमध्ये आहेत. सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल अॅकेडमिक्स ऑफ सायंसेस, इंजीनिअरिंग अँड मेडिसिनने एक ड्राफ्ट रिपोर्ट जारी केला आहे. यात एखाद्या लशीला परवानगी मिळाल्यानंतरची योजना सांगण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, की अमेरिकन सरकारचे ऑपरेशन वॉर्प स्पीड, तिसऱ्या टप्प्यावर पोहोचलेल्या 7 लशींचे समर्थन करू शखते. मात्र, यांपैकी 4 लशी फेल होणार आहेत.

Biostatistics जर्नलने प्रसिद्ध केलेल्या या अभ्यासानुसार, संक्रमक आजारांवरील लस यशस्वी होण्याची शक्यता केवळ 33.4 टक्केच असते. तसेच, लस यशस्वी ठरल्यानंतर चार टप्प्यांत तिचे वितरण केले जाईल, असे आरोग्य तज्ज्ञांनी या ड्राफ्ट योजनेत म्हटले आहे. 

यात, आरोग्य कर्मचारी, असुरक्षित लोक, वृद्ध आणि एखाद्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना ही लस सर्वप्रथम देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या स्वयंसेवकांनी कुठल्याही लशीच्या परीक्षणात भाग घेतला आहे, त्यांना प्राधान्य क्रमाने यशस्वी ठरलेल्या लशीचे लसीकरण करण्यात येणार आहे.

ऑपरेशन वॉर्प स्पीड -अमेरिकेने लवकरात लवकर कोरोना लस तयार करण्यासाठी ऑपरेशन वॉर्पस्पीड सुरू केले आहे. आतापर्यंत अमेरिकेने सहा संभाव्य कोरोना लशींवर अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. यात, Pfizer, Moderna आणि AstraZeneca या कंपन्यांच्या लशींचाही समावेश आहे. या सर्व लशी आता परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर आहेत. 

माकडांच्या तुटवड्यानं संशोधन रखडलं! -अमेरिकेतील लशीच्या यशस्वीतेवर चर्चा होत असतानाच, कोरोना लशीच्या परीक्षणासाठी वेळेवर माकडं मिळाली नाहीत, तर लस विकसित व्हायला वेळ लागेल, असा इशारा अमेरिकेतील संशोधकांनी दिला आहे. कोरोना लशीच्या परीक्षणासाठी माकडांची मागणी वाढली आहे. सर्वच वैज्ञानिकांना परीक्षणासाठी माकडांची आवश्यकता आहे. मात्र मागणी वाढल्याने आणि पुरवठा कमी होत असल्याने अनेक लशींचे संशोधन रखडले आहे.

द नॅशनल प्रायमेट रिसर्च सेंटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बायोमेडिकल रिसर्चमध्ये प्रामुख्याने रीसस ( Rhesus) माकडांचा उपयोग होतो. यासंदर्भात बोलताना, कॅलिफोर्निया नॅशनल प्रायमेट रिसर्च सेंटरचे कोएन वान रोमपे यांनी सांगितले, की संपूर्ण अमेरिकेतच या माकडांची कमतराता निर्माण झाली आहे. तसेच, रिसर्च फर्म बायोइक्वलचे सीईओ मार्क लेविस यांनीही म्हटले आहे, की आता आम्हाला Rhesus माकडं मिळमे अवघड झाले आहे. ते पूर्णपणे गायब झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

कोरोना लस तयार व्हायला लागणार उशीर; माकडांच्या तुटवड्यानं संशोधन रखडलं!

शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पmedicineऔषधं