शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News: कोरोना रुग्णांचा आकडा वाढला; चीननं लगेच मोठा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 3:03 AM

रेल्वेसेवेतील अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द; ९०,००० लोकांची सामूहिक चाचणी

बीजिंग : चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. येथील दोन विमानतळांवर देशांतर्गत सेवेतील १२५५ विमानांची उड्डाणे तसेच रेल्वेसेवेतील अनेक गाड्यांच्या फेºया बुधवारी रद्द करण्यात आल्या. तसेच ९०,००0 लोकांची सामूहिक चाचणी करण्यात आली. या शहरामध्ये २४ तासांत कोरोनाचे ३१ नवे रुग्ण आढळले आहेत.बीजिंग विमानतळांवरील ७० टक्के विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच, तेथील आंतरराष्ट्रीय विमानसेवाही स्थगित केली आहे. बीजिंगमध्ये येण्यासाठी किंवा तेथून बाहेर जाण्यासाठी मंगळवारपर्यंत तिकिटांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तिकीट परतावा देण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठेही काही दिवसांपुरती बंद ठेवण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. येथील ग्रंथालये, संग्रहालये, उद्यानांमध्ये क्षमतेपेक्षा ३० टक्के लोकांनाच प्रवेश द्यावा, असा आदेश देण्यात आला आहे. सध्या बीजिंगला प्रवास केल्याने आरोग्याला धोका पोहोचू शकतो असा इशारा चीनमधील विविध प्रांतांनीच मंगळवारी दिल्यानंतर अधिक काळजी घेण्यात येत आहे.चीनमध्ये मंगळवारी कोरोनाचे ५५ नवे रुग्ण आढळले. त्यातील ११ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यातील काही विदेशवारीहून आले आहेत. (वृत्तसंस्था)चीनमध्ये ७८ हजार कोरोनामुक्तबीजिंगमधील कोरोनाचा फैलाव पुन्हा सुरू झाला असला, तरी या शहरात त्या आजारामुळे अद्याप कोणीही बळी गेलेला नाही. चीनमधील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता ८३ हजारवर पोहोचली असून, अद्याप २५२ रुग्णावर उपचार सुरू आहेत. या देशात आजवर उपचारांनंतर ७८,३७९ लोक कोरोनातून पूर्णपणे मुक्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन