शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 8:41 AM

Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या  2,69,911 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 184 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 11,267 वर पोहोचली आहे. भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236 वर पोहोचली आहे. त्यात 32 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामध्ये इटलीचे 17, फिलिपिन्सचे 2, ब्रिटनचे 2, कॅनडा, इंडोनेशिया, सिंगापूरच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.

देश                    बाधित         मृत्यू

चीन                   80,967     3,248

इटली                 47,021     4,032

इराण                 19,644     1,433

द. कोरिया         8,652       94

स्पेन                  20,412     1,044

फ्रान्स                12,612     450

जर्मनी               19,848     59

स्वित्झर्लंड          5,381       56अमेरिका          16,638     225

इंग्लंड              3,983       177

जपान              963           33

थायलँड           322           1

भारत              223           5

पाकिस्तान      500           3

श्रीलंका           73             0

बांगलादेश       20            1

कोरोना विषाणूने चीननंतर आता युरोप खंडाला विळखा घातला आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका इटलीला बसला असून, आज दिवसभरात इटलीमध्ये तब्बल 627 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे युनायटेड किंग्डममध्येही कोरोनामुळे बिकट परिस्थिती ओढवली असून, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. इटलीमध्ये कोरोना विषाणूने आता चीनपेक्षा भयानक रूप धारण केले आहे. कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वीच इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज इटलीमध्ये दिवसभरात 627 जणांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीमध्ये सुमारे चार हजार जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेमध्ये शुक्रवारपर्यंत 14 हजारपेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे तसेच या साथीमुळे तिथे 200 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. या साथीला आटोक्यात आणण्याकरिता अमेरिकेतील राजकीय नेते व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी कंबर कसली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 14 हजार 366 वर पोहोचली . तिथे आतापर्यंत 217 जण मरण पावले. सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या देशांमध्ये अमेरिका सहाव्या क्रमांकावर आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे. अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये ही साथ पसरली आहे. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वात दाट लोकवस्तीचे राज्य आहे. तिथे कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार गुरुवारपासून बंद ठेवण्यात आले आहेत. सरकारने दिलेल्या आदेशानुसार तेथील रहिवासी आपल्या घरातूनच सर्व कामे पार पाडत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

Coronavirus : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह २0 शहरांचे व्यवहार थांबले

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीनAmericaअमेरिकाGermanyजर्मनीPakistanपाकिस्तान