शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

Coronavirus : कोरोनाच्या संकटामुळे झाले पाच मोठे बदल; काय धडा घेणार जग?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:47 AM

तरीही गेल्या काही दिवसांत पाहिलेले बदल कदाचित कायमचे नसतील, परंतु ते आशा पल्लवित करतात. 

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेलं असून, अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाच्या या संकटातही जगाला एक मोठा आणि वेगळाच अनुभव मिळाला आहे. लॉकडाऊन बर्‍याच देशांमध्ये केले गेले असले तरी यातून बरेच काही शिकण्यासारखे होते. जवळजवळ प्रत्येक देशाने हे समजून घेतले आहे की, असा धोका पुन्हा उत्पन्न होणार नाही आणि अशा कठीण प्रसंगात एकमेकांच्या मदतीशिवाय संकटावर मात करता येणार नाही. या महारोगराईवर नियंत्रण मिळवणं कठीण असलं तरी अशक्य नाही. तरीही गेल्या काही दिवसांत पाहिलेले बदल कदाचित कायमचे नसतील, परंतु ते आशा पल्लवित करतात. नमस्ते ही पद्धत झाली प्रचलितकोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा सर्वाधिक धोका हा हातांनी होतो. जर एखाद्या संक्रमित व्यक्तीने एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर व्हायरस त्याच्या हाताला चिकटतो. अशा परिस्थितीत सामाजिक अंतर राखण्यासाठी सगळ्यांनीच भारताचा नमस्कार केला. आता मिळवणे शक्य नसल्यानं अशा परिस्थितीत भारताने 'नमस्ते' जगाला दिले. दोन्ही हातांनी अभिवादन करण्याची ही पद्धत कोरोनाच्या काळात वाढत गेली. जपानमध्येही अशाच पद्धतीनं शुभेच्छा दिल्या जातात. घरातून काम करणं आता वास्तविकतालॉकडाऊनमुळे कॉर्पोरेट्समधील अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावं लागत आहे. परंतु ही परिस्थिती कायम राहणार नाही. लॉकडाऊनमुळे हे स्पष्ट झाले की, बर्‍याच कामाच्या गोष्टी घरात राहूनही करता येतात. मोठ्या आणि विकसित देशांमध्ये हे प्रचलित होतं, परंतु मुख्य प्रवाहात आलं नव्हतं. कोरोना व्हायरसमुळे घरातून काम करण्याची पद्धत आता प्रचलित झाली आहे. जगात वर्क फ्रॉम होममधून कशा पद्धतीनं काम झालं हे लवकरच आकड्यांमधून समोर येईल. कर्मचारीसुद्धा आता वर्क फ्रॉम होमची कंपनीकडे मागणी करू शकतात. तसेच वर्क फ्रॉम होम हेसुद्धा आता रोजगाराचं एक साधन होऊ शकतं. स्वच्छ हवा, सुंदर आकाशकोरोना विषाणूमुळे जगभरात टाळेबंदी आहे. लोकांना आपल्या घराबाहेर पडणं सोडून दिलं.  कारखाने बंद असल्यामुळे धूर हवेत मिसळणे आणि नदीमध्ये केमिकल सोडण्याचा प्रकार थांबला आहे. जेव्हा मनुष्याने निसर्गाला संधी दिली, तेव्हा त्यानंच स्वतःमध्ये स्वच्छ बदल स्पष्टपणे दाखवला. आकाश आता निळाशार दिसू लागला आहे. हवा श्वास घेण्यायोग्य झाली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. काँक्रिटच्या जंगलांमध्येही आता प्राणी दिसू लागले आहेत. प्रदूषणामुळे निर्माण झालेला वातावरणातील बदल हा गेल्या वर्षी दिल्ली आणि उत्तर भारतातील लोकांना जवळून पाहिला आहे. लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला कसा फायदा झाला हे सरकार कदाचित शिकेल. अशा निर्णयाची गरज आहे, जे पर्यावरणाचे किमान नुकसान करणार नाहीत. हायस्पीड इंटरनेटची आवश्यकता वर्क फ्रॉम होम निमित्तानं इंटरनेटचा वेगात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नेटवर्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी हाय-स्पीड इंटरनेटला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. इंटरनेटचा वापर व्यवसायात सुलभतेने कसा प्रभावीपणे करता येतो हे या निमित्तानं समोर आलं आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर वाढलाकोरोना विषाणूच्या काळात एक गोष्ट वेगळी आणि अद्वितीय अशी समोर आली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोठ्या बैठका आयोजित करणे आता सहजसोपे झाले आहे. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय, मोठ्या सभेसाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नसून यातून बरेच फायदे आहेत. पहिला म्हणजे मोठा खर्च कमी होणार आहे. दुसरे म्हणजे अशा बैठकांसाठी दुसऱ्या शहरात किंवा देशात जाण्यासाठी हवाई वाहतुकीचा वापर कमी होईल. प्रत्येक मोठा कार्यक्रम लहान-सहान कार्यक्रमांसह असल्याने त्यांचा खर्चही कमी केला जाईल. व्हीव्हीआयपी ही एक मोठी समस्या असून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यावरही तोडगा काढला जाऊ शकतो. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प