वॉशिंग्टन - जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिकेत कोरोना व्हायरस महामारीच्या नव्या लाटेने हाहाकार घातला आहे. तेथे गेल्या 24 तासांत तब्बल दोन लाखहून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच बरोबर आता अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 10 कोटी 55 लाख 9 हजार 184वर पोहोचला आहे.
वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, आतापर्यंत अमेरिकेत 2 लाख 45 हजार 799 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 66 लाख एक हजार 331 जण लोक बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. सध्या अमेरिकेत एकूण 37 लाख 12 हजार 54 जणांवर उपचार सुरू आहेत. तर यातील 19 हजार 374 जणांची प्रकृती गंभीर आहे.
अमेरिकेत या 'महामारीची सर्वात वाईट वेळ' येणे अद्याप बाकी - तज्ज्ञतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की, आगामी थंडी आणि सुट्ट्यांसाठी अमेरिका तयार नाही. कारण यावेळेपर्यंत कोरोना व्हायरस अमेरिकेत आतापर्यंतच्या सर्वात घातक स्थितीत असू शकतो. द गार्डियनमधील लेखाप्रमाणे, आता अमेरिकेत लवकरच सुट्ट्यांचा काळ येत आहे. या काळात येथे कौटुंबिक समारंभ होत असतात. यावेळी येथे कोरूनासंदर्भातील नियमांचे पालन होणे कठीण आहे. उन युनिव्हर्सिटीचे एक डॉक्टर मेगन राणे म्हणाले, "आता आम्ही महामारीच्या अत्यंत खराब काळात जात आहोत. यामुळे कोरोना महामारीसंदर्भात देशाचे भविष्य पुढील दोन महिन्यांवरच अवलंबून आहे.
CoronaVirus News : दिल्लीत कोरोना संसर्गाचा कहर; जाणून घ्या, टॉप-१० राज्यांमधील परिस्थिती...
आपण थकू शकतो व्हायरस नाही - WHOजागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख ट्रेडोस घेब्रेसस यांनी कोरोनाव्हायरससंदर्भात लोकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, या मातीशी लाडका आपण थकू शकतो मात्र कोरोना आपल्याकडून थकायला तयार नाही. यावेळी टेड्रेस यांनी, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यो बायडन यांच्या विजया बद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, आशा आहे की या महामारीचा सामना करण्यास, जागतिक सहकार्य मिळेल. यावेळी त्यांनी लोकांनात विज्ञानाचे अनुसरण करणे आणि व्हायरसच्या बाबतीत पूर्णपणे सजग रहाण्याचाही आग्रह केला. ट्रेडोस स्वतः एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. यमुळे त्यांनी स्वतःला क्वारंटाईनदेखील केले होते. महत्वाचे म्हणजे, अशक्त व्यक्तींवर कोरोना लवकर हल्ला करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.