वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी पॉर्न इंडस्ट्रीचा हब म्हटले जाणाऱ्या उत्तर अमेरिकेतील इंडस्ट्रीमध्ये चित्रिकरण थांबविण्यात आले आहे. कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला असून लागण झालेल्यांच्या संख्येमध्ये अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यामुळे पॉर्न इंडस्ट्रीची संघटना द फ्री स्पीच कोएलिशनने इंडस्ट्रीला ३१ मार्च पर्यंत टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पॉर्न अॅक्टरना एक मोठी अटही घातली आहे.
अमेरिका आणि कॅनडामधील सर्व १८+ मनोरंजनाचे चित्रिकरण करण्यास स्वेच्छेने बंद करण्यात आले आहे. ही बंदी पुढील सूचना मिळेपर्यत सुरू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून असे समजत होते की पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या स्टारना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना घरामध्येच आयसोलेट करण्यात आले आहे. या लोकांना तपासण्याची आवश्यक सामुग्री नसल्याने त्यांना कोरोना पॉझिटिव्ह समजण्यात येत आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
चित्रिकरणादरम्यान शारिरीक संबंध ठेवल्यास कोरोना पसरण्याची भीती आहे. यामुळे नवीन चित्रिकरण न करता जर कोणाचे जुने केलेले चित्रिकरण असेल तर ते प्रसिद्ध करू शकतात. मात्र, या स्टारनी घरातील व्यक्ती व्यतिरिक्त अन्य बाहेरच्या व्यक्तीसोबत अॅडल्ट कंटेंट बनविण्यावर बंदी आणण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष माइक स्टेबिल यांनी सांगितले की, इंडस्ट्रीतील सेट स्वच्छ असतात. यामुळे कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे. परंतू शारिरीक संबंध आल्यानंतर कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे.
कोरोनाचे संकट आल्याने पॉर्न इंडस्ट्रीला टाळे लावण्यात आले आहे. यामुळे घरी राहणाऱ्या पॉर्न स्टारनी याचा फायदाच उचलण्यास सुरुवात केली आहे. चित्रिकरण थांबल्याने वेबकॅम बिझनेस चांगला पर्याय त्यांना सापडला आहे. घरी बसून हे करत असल्याचे एका पॉर्न स्टारने सांगितले. कारण अधिक ग्राहक घरीच बसून आहेत. यामुळे कमाई वाढल्याचे लॉस अँजेलिसच्या एका पॉर्न स्टार केट केनेडी हिने सांगितले आहे.