नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे आरोग्य यंत्रणांवर आलेल्या दबावामुळे नियमित सेवांवर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका लहान मुलांना बसू शकतो, असा धोक्याचा इशारा युनिसेफनं दिला आहे. कोरोना संकटाचा जगभरात आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आगामी सहा महिने दररोज ६ हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती युनिसेफनं व्यक्त केली आहे. कोरोना संकटाचा मोठा परिणाम लहान मुलांवर होईल. बालमृत्यूदरात मोठी वाढ होईल. पाच वर्षांखालील मुलांना याचा मोठा फटका बसेल. या मुलांना आरोग्य सेवा देण्यासाठी १.६ अब्ज डॉलरच्या मदतीची आवश्यकता असल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. 'कोरोना संकटामुळे लहान मुलांच्या आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे. याबद्दल तत्काळ पावलं न उचलल्यास पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना मृत्यूचा धोका वाढेल. पुढील ६ महिने दररोज ६ हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे,' अशी भीती युनिसेफच्या कार्यकारी संचालिका हेन्रिटा फोरे यांनी बोलून दाखवली. आपण कोरोना नंतरच्या जगाची कल्पना करताना लहान मुलांचं आरोग्य जपण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळाल्यास मुलांना सुदृढ राखण्यास मदत होईल, असं फोरे म्हणाल्या. योग्य वेळी मुलांवर आरोग्य सेवा न मिळाल्यास पुढील सहा महिने दररोज ६ हजार मुलं जीव गमावतील, अशी आकडेवारी अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांच्या विश्लेषणावर आधारित आहे. लॅन्सेट ग्लोबल हेल्थ नावाच्या मासिकात ही आकडेवारी बुधवारी प्रसिद्ध झाली. गिलगिट आणि बाल्टिस्तानमधील षडयंत्राविरोधात उतरला भारत; पाकला दिला कडक इशारा..तर तीन महिने पगार न मिळालेल्या ‘त्या’ 11 कोटी लोकांना कोणता लाभ होणार?
‘स्वावलंबी भारत’चा दुसरा टप्पा :शेतकरी, मजुरांसाठी ३.१६ लाख कोटी
कमी आयात आणि जास्त निर्यात हाच देशाच्या समृद्धीचा मार्ग!, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
एअर इंडियाची १९ मे ते २ जूनदरम्यान विमानसेवा, अडकून पडलेल्यांना दिलासा