न्यूयॉर्क - कोरोनाच्या भीतीच्या छायेत २०२० हे वर्ष घालवल्यानंतर आता आजपासून सुरू झालेल्या नव्या वर्षावरही कोरोनाचे सावट आहे. मात्र नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनावरील लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून मोठी बातमी आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने फायझर अँड बायोएनटेकच्या कोरोनावरील लसीला मान्यता दिली आहे. तसेच या लसीच्या आपातकालीन वापरास परवानगी दिली आहे. जगभरातील आपल्या कार्यालयामधून तेथील देशांशी या लसीच्या लाभाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे.जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याने जगभरातील देशांमध्ये फायझरच्या कोरोनावरील लसीच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. गरीब देशांपर्यंत कोरोनावरील ल लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी एमर्जन्सी यूज लिस्टिंग प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. या सूचीमध्ये दाखल झाल्यानंतर कुठल्याही कोरोनावरील लसीला जगभरातील देशांमध्ये सहजपणे आपातकालीन वापराची परवानगी मिळणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले.संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेने फायझरच्या लसीची समीक्षा केल्यानंतर सांगितले की, या लसीमधून प्रभावीपणा आणि सुरक्षेसाठाी आवश्यक निकष पूर्ण झाले पाहिजेत. फायझर-बायोएनटेकच्या लसीला अमेरिका, ब्रिटन, युरोपीय संघ आणि सुमारे डझनभर अन्य देशांमध्ये आधीच मान्यता दिलेली आहे.फायझरच्या कोरोनावरील लसीला सर्वात आधी ब्रिटनने एमर्जंन्सी वापराची परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिकेनेही या लसीच्या वापरास मान्यता दिली होती.
coronavirus: नव्या वर्षातील मोठी बातमी, फायझरच्या लसीला WHOची मान्यता, आपातकालीन वापरास परवानगी
By बाळकृष्ण परब | Published: January 01, 2021 8:53 AM
pfizer corona vaccine Update : कोरोनाच्या भीतीच्या छायेत २०२० हे वर्ष घालवल्यानंतर आता आजपासून सुरू झालेल्या नव्या वर्षावरही कोरोनाचे सावट आहे. मात्र नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनावरील लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून मोठी बातमी आली आहे.
ठळक मुद्देजागतिक आरोग्य संघटनेने फायझर अँड बायोएनटेकच्या कोरोनावरील लसीला दिली मान्यता या लसीच्या आपातकालीन वापरास दिली परवानगी जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याने जगभरातील देशांमध्ये फायझरच्या कोरोनावरील लसीच्या वापराचा मार्ग मोकळा