शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
5
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
6
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
7
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
8
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
9
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
10
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
11
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
12
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
13
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
14
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
15
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
16
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
17
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
18
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
19
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
20
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान

Omicron: ओमायक्राॅनचा मुकाबला करण्यासाठी बुस्टर गरजेचा; रिपोर्टमधून झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 5:23 AM

ऑस्ट्रेलियात संशोधन : दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांनी बूस्टर

सिडनी : कोरोना विषाणूवरील लसीची दुसरी मात्रा घेऊन तुम्हाला सहा महिने झाले असतील तर आता पूरक मात्रा (बूस्टर डोस) घेण्याचा विचार करा. ही मात्रा तुम्हाला कोविडपासून अतिरिक्त संरक्षण देईल. विशेष म्हणजे विषाणूचे नवे रूप ओमायक्रॉनपासूनही या मात्रेमुळे संरक्षण मिळणार आहे. ऑस्ट्रेलियात एका अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. प्रारंभिक आकडेवारीतून हे समजते की, फायझर बूस्टर ओमायक्रॉनपासून संरक्षण देऊ शकतो. लसीच्या दोन मात्रांनी कोरोनापासून जसे संरक्षण दिले होते, तीच भूमिका पूरक मात्रा पार पाडेल.

जेव्हा तुम्ही कोविड लसीची पहिली मात्रा घेता, तेव्हा तुमचे शरीर स्पाइक प्रोटिन नावाच्या विषाणूच्या एका भागाविरोधात प्रतिकारशक्ती उत्पन्न करतो. त्या परिस्थितीत जर तुम्ही सार्स-कोव-२ विषाणूच्या संपर्कात असाल तर तुमची प्रतिकार व्यवस्था विषाणूला लवकर ओळखू शकते व त्याला प्रतिकार करू शकते. कोविड लसीच्या एका मात्रेसाठी प्रतिकार प्रतिक्रिया सामान्यत: अल्पकालीन असते. एका खंबीर आणि दीर्घकाळ चालणाऱ्या प्रतिक्रियेसाठी लसीची दुसरी मात्रा आवश्यक असते. वय वाढते तसे आपल्या शरीरात अँटीबॉडीचे प्रमाण कमी होत जाते. तिला कमकुवत प्रतिकार क्षमता समजले जाते.

कोविड लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांनी अँटीबॉडी कमी होत जाते. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांनी कोविड संक्रमणाविरोधात लसीची प्रतिकारक्षमता सरासरी १८.५ टक्के कमी होत जाते. 

संसदेच्या समितीची महत्त्वाची शिफारससंसदेच्या एका समितीने आरोग्य मंत्रालयाला वेगवेगळ्या संबंधित संस्थांसोबत समन्वय साधून कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या स्वरूपांना तोंड देण्यासाठी कोरोनाविरोधी लसीच्या पूरक मात्रेची किती गरज आहे, याचा शोध लावला पाहिजे, असे सुचविले आहे. संसदेच्या स्थायी समितीने शुक्रवारी राज्यसभेत सादर केलेल्या आपल्या अहवालात रुग्णालयात खाटांचा कमाल दर निश्चित करणे, चिकित्सा कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करणे, बूस्टर मात्रेची आवश्यकता आकलन करण्याचीही शिफारस केली आहे.

कोरोनाचे ८,५०३ रुग्ण, ६२४ मृत्यूशुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ८,५०३ रुग्ण आढळले तर ६२४ जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्यांची संख्या ४,७४,७३५ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ९४,९४३ आहे. गेल्या सलग ४३ दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या १५ हजारांच्या आत राहिली. तर गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांमध्ये २०१ ची वाढ झाली. 

अनिवासी भारतीयाची पत्नी,  नातेवाईकालाही ओमायक्रॉन जामनगर (गुजरात) :   एक आठवड्यापूर्वी ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळलेल्या एका अनिवासी भारतीय व्यक्तीची पत्नी आणि त्यांच्या एका नातेवाईकालाही या नवीन विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या