अमेझॉनचं जंगल आगीत होरपळलं. ते सा:या जगावर संकट होतंच. त्या संकटाचे ढग जरा उतरले नाही तोच, आता अमेझॉनच्या जंगलातही कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे.तसं ब्राझीलच्या आरोग्य मंत्र्यांनी जाहीरपणो मान्य केलं. मूलनिवासी असलेल्या अमेझॉनच्या जंगलात एकुण 9 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी सहांची प्रकृती स्थिर असली तरी एका 15 वर्षाच्या मुलावर आठवडाभर दवाखान्यात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली. त्याला श्वसनाचा गंभीर त्रस होऊ लागला आणि त्यातच तो दगावला.या घटनेनं मूलनिवासी, आदिवासी जमातींमध्येही मोठय़ा भीतीचं वातावरण आहे. त्याचं कारण असं की, हे लोक जगापासून आजही लांब आहेत. त्यांनी विकसित, जागतिकीकरण झालेलं जग यापासून अजूनही दूर राहणंच निवडलं आहे. मात्र त्याचा एक परिणाम असाही झाला की, जगभरातले लोक ज्या विषाणूंना ‘इम्यून’ झाले, म्हणजे त्यांची प्रतिकारशक्ती कालौघात ज्या विषाणूंसाठी तयार झाली, तशी या माणसांची झालेली नाही.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तिथं झाला तर त्यामुळे अन्य विषाणूंना, आजारांनाही ही माणसं बळी पडतील अशी भीती आहे.अमेझॉन जंगलात आजच्या घडीला विविध 300 वांशिक समूह मिळून साधारण साडे आठ लाख मूलनिवासी लोक आहेत. त्यापैकी 27 हजार लोक यानोमामी या वंशाचे असून त्यांच्याचपैकी एका 15 वर्षाचा मुलगा आता कोरोनापायी दगावला आहे.एकीकडे बाहेरच्या जगात या मूलनिवासींचा संपर्क वाढत आहे, दुसरीकडे त्यांनी आधुनिक लसीकरण नाकारलं आहे. आमच्या गावात, आम्हाला लसीकरणाची गरज नाही असं म्हणून अनेक वांशिक समूहांनी आपण पारंपरिकच आयुष्य जगू असा निर्धार आजवर जपलेला आहे.बाहेरच्या जगाशी संपर्कच नव्हता तेव्हा इतरांपासून त्यांना कुठल्याच संसर्गाचा धोका नव्हता, मात्र आता ही माणसं अधिक लवकर संसर्गजन्य रोगांना बळी पडतील अशी शक्यता आहे. कारण तेच बाकी जगभरातल्या माणसांची प्रतिकारशक्ती ज्या विषाणूंना आता सहज मारते, तेच विषाणू या माणसांसाठी नवे असल्यानं त्यांचा धोका अधिक वाढतो.उत्तर ब्राझीलच्या बोआ विस्ता शहरात हा योनोमामी वंशाचा मुलगा दगावला. त्यांची लोकसंख्या आधिच कमी आहे. त्यांचा नेता डारिओ यावारीओमा सांगतो, ‘ डेंजरस डिसिज’, बट हाऊ टू फाईट?’हाच खरा प्रश्न आहे, मानवी अस्तित्वाच्या मूळर्पयत घेऊन जाणा:या या मूलनिवासी माणसांच्या जगण्याचा कल अजूनही निर्सगदत्त आहे. मानवाने उत्क्रांत होत जाताना स्वीकारलेल्या अनेक गोष्टी त्यांनी नाकारल्या आहेत. ते जंगल नियमाप्रमाणो जगतात, निसर्गात होणारे आजार आपल्या पारंपरिक ज्ञानावर बरेही करतात. मात्र जागतिकीकरणातून आलेला हा विषाणू, त्याचा संसर्ग, आणि त्यातून होणारी गुंतागुंत कशी टाळायची हे मात्र या माणसांना कळत नाही.योनोमामी ही जमान ब्राझील आणि व्हेनेज्युएलाच्या जंगलात राहते. ती ही विखुरलेली. त्यामुळे तिथवर कोरोना कसा पोहोचला याचा माग घेणं सुरु आहे. एकुण 9 मुलनिवासींना संसर्ग झालेला असून त्यातला एक दगावल्यानं, या मूलनिवासींच्या आरोग्याची काळजी स्थानिक सरकार कशी घेत आहे, यासंदर्भात जगभरातला दबावही वाढला आहे.या जंगलात हा कोरोना व्हायरस बेकायदा खाणमजूर म्हणून काम करण्यामूळे पोहोचला असावा अशी प्रथमदर्शनी चर्चा आहे. हे खाणकामगार जंगलात राहतात, जवळच्या शहरात जातात , परत येतात, त्यांच्याकडून हा संसर्ग पोहोचला आणि मूलनिवासी विविध विषाणूंना ‘इम्यून’ नसल्यानं अल्पवयीन मुलगा त्यात दगावला अशी शक्यता आहे.उद्या मूलनिवासींमध्ये हा आजार बळावलाच तर काय करणार असाही प्रश्न मोठा आहे.त्यांचा अधिवास असलेल्या परिसराला लागून जी शहरं आहेत, त्यात 90टक्के रुग्ण आजच कोरोनाचे आहेत.त्यांच्यापासून आणि अन्य माणसांपासूनही विलगीकरणात या मूलनिवासींना कसं ठेवणार, बाधा कशी टाळणार असे मोठे गहन प्रश्न सध्या ब्राझील सरकारसमोर आहेत.कोकमा जमातीच्या एक 29 वर्षीय तरुणीला सर्वप्रथम कोरोनाचं निदान झालं.त्यानंतर यंत्रणा हलली मात्र तोवर अन्य जमातींमध्येही हा प्रसार झाल्याचं दिसलं. नऊ जण बाधित असून आता पहिला बळी गेल्यानंतर जग एकदम खडबडून जागं झालं.पुढे काय? याचं उत्तर कुणाकडेच नाही.
coronavirus : अमेझॉनच्या जंगलात कोरोना, मूलनिवासी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 1:20 PM
अमेझॉनच्या घनदाट जंगलात जागतिकीकरणाची विषाणू छाया!
ठळक मुद्देनऊ जण बाधित असून आता पहिला बळी गेल्यानंतर जग एकदम खडबडून जागं झालं.