लंडन : इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालवल्याने आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे. यामुळे ब्रिटनमध्ये त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. तर अनेकांनी त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली.
जॉन्सन हे 27 मार्चला कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले होते. जॉन्सन यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. तसेच त्यांच्या वाग्दत्त वधूलाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर जॉन्सन यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांच्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने बोरिस यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातूनच ते देशाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यावर विरोधकांनी त्यांना पंतप्रधानपद सोडण्यास सांगितले होते.
बोरिस हे ५५ वर्षांचे असून त्यांच्यावर सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, दुपारनंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे.