वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेपाठोपाठ इटली, स्पेनला बसला आहे. कोरोना व्हायरसचा केंद्रबिंदू हे चीनमधील वुहान शहर असल्यानं चीनसंदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच अमेरिकेतल्या एका वृत्तवाहिनीनं चीननं हा व्हायरस बनवल्याचा दावा केला आहे. चीनमधल्या वुहानजवळच्या एका लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार करण्यात आला होता. याच्या पाठीमागे चीनचा विशेष उद्देश असल्याचं त्या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. अमेरिकेची वृत्तवाहिनी असलेल्या फॉक्स न्यूजच्या रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरस वुहानच्या लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तो व्हायरस तयार करण्याच्या पाठीमागे चीनचा एक वेगळाच हेतू होता. अमेरिकेच्या वैज्ञानिकांइतकेच आमचे वैज्ञानिक काहीही करण्यास सक्षम असल्याचं चीनला दाखवून द्यायचं होतं. चीननं कोरोना व्हायरसची निर्मिती करून तो एक खतरनाक व्हायरस तयार करू शकतो हे त्यांनी अमेरिकेला दाखवून दिलं. एवढंच नव्हे तर अशा व्हायरसला अमेरिकेपेक्षा चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात आणू शकतो हे चीनला सिद्ध करायचं होतं. कोरोना व्हायरस तयार करण्याचा चीनचा हा आतापर्यंतचा गोपनीय आणि महागडा प्लॅन होता. या व्हायरसला सुरुवातीलाच लॅबमध्ये रोखण्यासंबंधी दस्तावेजांचा अभ्यास केल्यास इतर अनेक गोष्टी उघड होतात. विशेष म्हणजे वुहानच्या त्या बाजारात वटवाघळांची विक्रीत होत नव्हती. जिथून हा कोरोना व्हायरस पसरल्याचा सांगितलं जातं. चीननं खेळला अनोखा डावकोरोना व्हायरस पसरल्यानंतर चीननं आणखी एक चाल खेळली आहे. त्यानं जाणूनबुजून पशु बाजारातून व्हायरस पसरल्याचं सांगितलं. जेणेकरून लॅबमध्ये व्हायरस तयार केल्याच्या माहितीवर पडदा पडेल. अमेरिकेनंही सांगितलं आहे, हा व्हायरस कसा पसरला हे चीनला सांगावंच लागणार आहे.
Coronavirus: चीनच्या वुहान लॅबमध्ये 'विशेष उद्देशा'नं बनवला कोरोना व्हायरस; अमेरिकी चॅनलचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 8:33 AM