बीजिंगः चीननं कोरोना व्हायरससंबंधी माहिती लपवून ठेवल्याचा अमेरिका वारंवार आरोप करते आहे. चीननं जगासमोर कोरोना विषाणूसंबंधी माहिती उघड न केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवला जात आहे. विशेष म्हणजे अमेरिका करत असलेल्या आरोपात तथ्य असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर ७ दिवस तो व्हायरस शी जिनपिंग यांनी चीनमध्ये पसरू दिला, त्याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. तसेच त्यांनी सात दिवस गप्प राहण्याची भूमिका घेतल्याचंही चिनी कागदपत्रांतून उघड झालं आहे. १४ जानेवारीला कोरोनासंबंधी माहिती मिळालेली होती. ७ दिवस कोरोना पसरत असतानाही त्यांनी अलर्ट जारी केला नाही. एसोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, चिनी सरकारच्या अंतर्गत दस्तावेजातून याचा खुलासा झालेला आहे. चीनच्या आरोग्य यंत्रणांनी १४ जानेवारीलाच सांगितलं होतं की, कोरोना व्हायरसच्या महारोगराईचा आपण सामना करत आहोत. परंतु त्यांनी सात दिवस लोकांना सतर्क केलं नाही. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या महारोगराईशी दोन हात करण्याचा कर्मचाऱ्यांना आदेश दिला होता, परंतु वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लोकांना सतर्क केलं नाही. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ७ दिवस लोकांना दिली नाही कल्पनाराष्ट्रपती शी जिनपिंग यांनी २० जानेवारीला या महारोगराईबद्दल लोकांना सांगितलं. तोपर्यंत तीन हजारांहून अधिक लोक या व्हायरसनं संक्रमित झाले होते. चीनच्या रोग नियंत्रण केंद्राच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीची नोंदणी केली नाही. परंतु एपीसीकडून प्राप्त झालेला बुलेटिनमध्ये याचा खुलासा झाला होता. ५ जानेवारी ते १७ जानेवारीदरम्यान रुग्णालयात शेकडो रोगी भरती करण्यात आले होते. फक्त वुहानमध्येच नव्हे, तर जगभरात असे होत होते. वुहानच्या डॉक्टर्स अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे केला कानाडोळावुहानमधले डॉक्टर्स आणि नर्सेसनी कोरोना व्हायरसचा प्रसार होत असल्याचे संकेत डिसेंबर २०१९ला दिले होते. परंतु अधिकाऱ्यांनी त्या डॉक्टर आणि नर्सेसची तोंडं बंद केली. तसेच असा इशारा दिल्यानं त्या डॉक्टरांना शिक्षासुद्धा देण्यात आली. अधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांपासून लपवून ठेवलं सत्यअधिकाऱ्यांना कोरोना संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी वरिष्ठ नेत्यांपासून ही बाब लपवून ठेवली. चीनच्या बाहेर संक्रमण झाल्याचं पहिलं प्रकरण १३ जानेवारीला थायलंडमध्ये उघडकीस आलं. तेव्हा या महारोगराईचा बीजिंगच्या नेतृत्वाला कल्पना आली. चीनचे आरोग्य अधिकारी मा शिवावेई म्हणाले, कोरोना व्हायरस परदेशात पसरल्यानंतर चीनला पावलं उचलावी लागली. १४ जानेवारीला एक गुप्त फोनसुद्धा करण्यात आला, त्यावरून चीनचे अधिकारीही चिंतीत होते.
Coronavirus: धक्कादायक खुलासा! राष्ट्रपती जिनपिंग यांनी ७ दिवस गप्प राहून चीनमध्ये पसरू दिला कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 10:26 AM