शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
2
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
3
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
4
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
5
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
6
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
7
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
8
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
9
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
11
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
13
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
14
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
15
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
16
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
17
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
18
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
19
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
20
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....

Coronavirus : जगभरात चीन पडला एकाकी; अमेरिकेची भूमिका ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 1:33 PM

चीन कोरोना विषाणूसाठी जबाबदार आढळल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही अमेरिकेनं चीनला दिला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचं केंद्रबिंदू हे चीनमधील वुहान शहर असल्याचा आरोप अमेरिकेकडून सातत्यानं करण्यात येत आहे.चीननं कोरोना व्हायरसची कल्पना न देता जगभरात पसरू दिल्यानं त्याबाबत चीनच्या भूमिकेवर अनेक देशांना संशय आहे. चीन कोरोना विषाणूसाठी जबाबदार आढळल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही अमेरिकेनं चीनला दिला आहे.

वॉशिंग्टनः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून, अख्ख्या जगाला याचा फटका बसत आहे. कोरोनाचं केंद्रबिंदू हे चीनमधील वुहान शहर असल्याचा आरोप अमेरिकेकडून सातत्यानं करण्यात येत आहे. तसेच चीननं कोरोना व्हायरसची कल्पना न देता जगभरात पसरू दिल्यानं त्याबाबत चीनच्या भूमिकेवर अनेक देशांना संशय आहे. चीन कोरोना विषाणूसाठी जबाबदार आढळल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही अमेरिकेनं चीनला दिला आहे. चीनची भूमिका पारदर्शक नसल्याचा आरोप करत ऑस्ट्रेलियानेही या विषाणूच्या उत्पत्तीच्या तपासणीची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे.अमेरिकेच्या सैन्याने कोरोना विषाणू चीननं जगभरात पसरवल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर जगातील कोरोनाच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या अनेक देशांना वैद्यकीय उपकरणे पुरवून चीन प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचा ठपकाही अमेरिकेनं चीनवर ठेवला आहे. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अमेरिकेसह पाश्चात्य देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यात अपयशी ठरल्याने चीनला जगाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर काही विश्लेषक असेही म्हणतात की, कोरोना विषाणूच्या संकटामुळे चीनबाबत जगभरात अविश्वास निर्माण झाला आहे आणि जवळपास सर्व देश चीनशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांचा फेरविचार करतील. अनेक देश कोरोना विषाणूची उत्पत्ती आणि चीनच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत.आतापर्यंत कोरोनानं चीनमध्ये सुमारे 5000 मृत्यू झाले आहेत, तर अमेरिकेत कोरोनामुळे 40,000 हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. इटली आणि स्पेनमध्येही मृतांची संख्या भीतीदायक आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह जगातील अनेक देशांनीही चीन कोरोनाग्रस्तांची देत असलेल्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला आहे. शुक्रवारी वुहानमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या चीनने अचानक 50 टक्क्यांनी वाढवली, तेव्हा ही शंका उपस्थित केली जाऊ लागली. चीनने म्हटले आहे की काही रुग्णालयांमध्ये घाईघाईने मृत्यूची नोंद योग्य प्रकारे झाली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा चीनवरील हल्ला तीव्र केला आहे. 1970मध्ये औपचारिक मुत्सद्दी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आता अमेरिका-चीन संबंध सर्वात वाईट टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत, असे पेकिंग विद्यापीठाचे संशोधक वांग जिसी यांनी एका मुलाखतीत सांगितले.दोन्ही देशांचे व्यावसायिक संबंध आधीच तणावग्रस्त होते आणि आता त्यात सुधारणा होण्याची आशाही संपुष्टात आल्यासारखे दिसते आहे. ब्रिटनमध्येही चीनविरोधी भावना दिसू लागल्या आहेत. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी कठोरपणे सांगितले की, चीनमध्ये कोरोना साथीचा प्रसार कसा झाला आणि त्यांनी कोरोनाला थांबवण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले हे स्पष्ट करावे लागेल. कंझर्व्हेटिव्ह पार्टी ऑफ ब्रिटनच्या नेत्यांनी चीनसंदर्भात कडक भूमिका घेण्यास ब्रिटन सरकारला सांगितले आहे. अगदी ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनीही म्हटले आहे की, बीजिंगच्या कोणत्याही धमकीविरुद्ध ते अधिक सतर्क राहतील. युरोप आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारांनी चिनी कंपन्यांना आर्थिक पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर देशातील स्वस्त मालमत्ता खरेदी करण्यास बंदी घातली आहे. टोकियोने अनेक जपानी कंपन्यांना चीनबाहेर पुरवठा साखळी उभारण्यासाठी 2.2 अब्ज डॉलरची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अमेरिका आणि त्याचे मित्र देशच केवळ चीनकडे संशयाने पाहत नाहीत. चीनचा मित्र देश असलेल्या उत्तर कोरियानेही साथीच्या सुरुवातीसच चीनला लागून असलेल्या आपल्या सीमा बंद केल्या आहेत. असे करणारा तो पहिला देश होता, तेव्हा चीनने आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदीवरून उत्तर कोरियावर कडाडून टीका केली होती.उत्तर कोरियाप्रमाणेच रशियानेही महारोगराईच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या काळात चीनशी असलेली सीमा बंद केली. इराणी अधिका-यांनीही या साथीची माहिती लपवून ठेवल्याबद्दल चीनवर टीका केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅनक्रो यांनी रविवारी चीन सरकारवर कठोर भाष्य केले. प्रत्येकाने स्वत: चा मार्ग निवडला आणि आज चीन काय आहे, याचा मी आदर करतो, परंतु कोरोना विषाणूचा सामना करण्यास तो अधिक यशस्वी झाला, असे म्हणणे चुकीचे ठरेल. बर्‍याच गोष्टी घडल्या ज्या आपल्याला माहीत नसतात. आपण लोकशाही व मुक्त समाजाची तुलना अशा समाजाशी करू शकत नाही, जेथे सत्य लपवले जाते. साथीच्या आजाराशी लढण्याचे स्वातंत्र्य संपल्यास पाश्चात्य देशांमधल्या लोकशाहीला धोका निर्माण होईल.आपण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा संदर्भ देऊन आपला मूळ डीएनए(लोकशाही) सोडू शकत नाही. फ्रान्स आणि चीनमध्ये आणखी एका विषयावरून वाद झाला. चिनी दूतावासाच्या संकेतस्थळावरील एका लेखात असे म्हटले आहे की, पाश्चात्य देशांनी आपल्या वडिलधा-यांना केअर होममध्ये मरणासाठी सोडले आहे. फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चिनी राजदूताला बोलावून यासंदर्भात कडक आक्षेप नोंदवला. नेदरलँड्स, स्पेन आणि तुर्कीसह अनेक देशांनी चीननं पुरवठा केलेल्या वैद्यकीय उपकरणांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केनियामध्ये चीनने बेल्ट अँड रोड अंतर्गत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, परंतु तिथेसुद्धा चीनबद्दल असंतोषही आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन