कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 82,156 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,34,825 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,02,468 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीत 17,127 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 135,586 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या 14,045 वर गेली आहे. कोरोनामुळे चीनमध्ये 3,333, अमेरिकेत 12,857, स्पेनमध्ये 14,045, इराणमध्ये 3,872, फ्रान्समध्ये 10,328, जर्मनीमध्ये 2,016 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात आतापर्यंत 150 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 5000 हून अधिक झाली आहे. तर दुसरीकडे महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा चार लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवर कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला.
स्पेनमध्ये कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून मंगळवारी तेथे तब्बल 743 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येथे कोरोनामुळे मरणाऱ्यांचा आकडा आता 14,045 वर पोहोचला आहे. या देशात कोरोनाने असे रुप धारण केले आहे, की जिकडे-तिकडे केवळ मृतांचा ढीग दिसत आहे. 'ला अल्मुडेना' ही या देशातील सर्वात मोठी स्मशानभूमी आहे. ही स्मशानभूमी माद्रिद येथे आहे. या स्मशानभूमीत दर 15 मिनिटाला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार केला जात असल्याचे चित्र आहे. या अंत्यसंस्कारासाठी 5 हून अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी नाही. इटलीनंतर स्पेनला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीनंतर येथेच सर्वाधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! लॉकडाऊनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारुच्या बाटल्या अन्
CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५१४९वर पोहोचली, १४९ जणांचा मृत्यू
CoronaVirus: 14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार; १५ पासून देशात काय काय बदलणार?