जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,54,247 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,250,432 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 571,577 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 37,158 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 710,021 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 172,434 वर गेली आहे. तर तब्बल 22,745 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या 22,745 वर गेली आहे. कोरोनामुळे चीनमध्ये 4,632 , स्पेनमध्ये 22,745, इराणमध्ये 4,958, फ्रान्समध्ये 18,681, जर्मनीमध्ये 4,352 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. लॉकडाऊनआधी केवळ 3 दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत होते. आता 6.2 दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होते. काही राज्यांमध्ये मोठी सुधारणा दिसत असून त्यात केरळ, ओडिशा या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील 13.6 टक्क्यांवर पोहोचले असल्याची सकारात्मक बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी अधोरेखित केली. लॉकडाऊनचा प्रभाव दिसू लागल्याचे ते म्हणाले.
देशात 1919 रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सज्ज आहेत. 1 लाख 73 हजार खाटा तयार आहेत. 21 हजार 800 आयसीयू कक्ष उभारण्यात आले असल्याने भारत दिवसेंदिवस तयार होत आहे. आतापर्यंत देशात लाख 19 हजार 400 जणांची चाचणी करण्यात आली. गुरुवारी 28 हजार 390 जणांची चाचणी करण्यात आली आहे. बीसीजी लसीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होत असल्याची चर्चा आहे. मात्र त्यावर ठोस काहीही सांगता येणार नसल्याचे आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले. बीसीजी लसीचा अभ्यास पुढच्या आठवड्यांपासून सुरू करू. सध्यातरी आमच्याकडे कोणतेही निष्कर्ष नाहीत. त्यामुळे बीसीजी लस कोरोनासाठी द्या, असे सांगता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला
‘कोरोना’ विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम हवा; विधी तज्ज्ञांचे मत