नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 18,892 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4,22,614 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,08,879 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
चीनमध्ये 3,281,इटलीत6, 820, अमेरिकेत 775, इराणमध्ये 1,934, स्पेनमध्ये 2,991, जर्मनीमध्ये 159, फ्रान्समध्ये 1,100 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 536 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जागतिक महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसमुळे इटलीत हाहाकार माजला आहे. चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. आतापर्यंत इटलीत6 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.
कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनानंतर चीनमध्ये'हंता' व्हायरसने एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरससारखा हंता व्हायरस घातक नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण कोरोनासारखा हा हवेद्वारे पसरत नाही. हा व्हायरस उंदीर, खार यांच्या संपर्कात आल्यास होतो. उंदरांनी घरात आतबाहेर केल्यास हा व्हायरस पसरतो. जर कोणी निरोगी असेल आणि तो जर हंता व्हायरसच्या संपर्कात आला तर त्याला लागण होते, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डायरिया आदी लक्षणे दिसून येतात.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : २१ दिवस लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा
Coronavirus : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडणार; इम्रान खान यांच्याकडून लॉकडाऊनची घोषणा