नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 27,370 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 5,97,458 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,33,373 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीत 9134 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमध्ये 3295, अमेरिकेत 1704, स्पेनमध्ये 5138, इराणमध्ये 2378, फ्रान्समध्ये 1995, जर्मनीमध्ये 391 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक झाली आहे.
अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसनं कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाने इटलीमध्ये 970 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला असून, पुन्हा एकदा भयानक विक्रम नोंदविला गेला आहे. जगभरात या धोकादायक विषाणूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये अमेरिकाही आघाडीवर आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून, एका दिवसात 569 लोकांचा मृत्यू झाला. यासह येथे एकूण मृत्यूची संख्या 4,934वर गेली आहे. दुसरीकडे महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोना अलर्ट! ‘या’ धोकादायक वेबसाईटवर चुकूनही करू नका क्लिक
Coronavirus : धक्कादायक! ‘कोरोना पसरवूया’, इंजिनिअरच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टने खळबळ
Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू
CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!