रोमः जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनानं जवळपास १९८ देशांना विळख्यात घेतलं आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात २२ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे एकट्या इटलीत ८२०० जणांना जीव गमवावा लागला आहे. चीनच्या पाठोपाठ कोरोना व्हायरसनं इटली आणि स्पेनमध्ये धुमाकूळ घातला आहे. इटलीमध्ये नवीन ६१५३ संक्रमित झालेले रुग्ण समोर आले आहेत. तर हीच संख्या जागतिक स्तरावर ५ लाखांच्या पार गेली आहे. वॉशिंग्टनच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, इटलीत ६१५३ नवीन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. अशा प्रकारे इटलीमध्ये ८०५३९ प्रकरणं समोर आली आहेत. संक्रमितांची ही संख्या चीनच्या बरोबरीची आहे. इटलीच्या सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सी रिपोर्टनुसार, गुरुवारी दिवसभरात ६६२ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील मृतांची संख्या ८ हजारांच्या पार गेली असून, कोरोना संक्रमितांची संख्या ८०५८९पर्यंत पोहोचली आहे. इटलीसारखंच स्पेनमध्येही कोरोनानं थैमान घातलेलं आहे. स्पेनमध्ये झालेले मृत्यूंच्या आकड्यांनी चीनमधल्या मृतांच्या आकड्यालाही मागे टाकले होतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चीनमध्ये या रोगराईचा उगम झाला.कोरोना व्हायरसनं हळूहळू पूर्ण जगाला वेढा घातला. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, या जीवघेण्या रोगानं स्पेनमध्ये आतापर्यंत ४३६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाची बाधा झालेले ५७७८६ रुग्ण सापडले आहेत. त्यातील ७०१५ लोक बरेसुद्धा झाले आहेत. चीनमध्ये कोरोनानं झालेल्या मृतांचा आकडा ३२९१ आहे. अशातच इटलीनंतर मृतांच्या आकडेवारीत स्पेन आणि चीनचा नंबर लागतो. भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या वर असली तरी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या मात्र त्यामानाने खूपच कमी म्हणजे ८००च्या घरात आहे. योग्य उपचारांमुळे रुग्णही बरे होत आहे. चीनमधून हा आजार जगभर पसरला असला तरी सर्वाधिक साडेसात हजारांपेक्षा अधिक लोकांचे बळी इटलीत गेले आहेत.युरोपात पुन्हा नवे रुग्ण : स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीत नव्या रुग्णांची संख्या वाढत असून, ती चिंतेची बाब आहे. स्पेनमध्ये सुमारे १० हजार ७००, फ्रान्समध्ये सुमारे २४००, तर जर्मनीत २२०० च्या आसपास नवे रुग्ण आढळले आहेत.
CoronaVirus : धक्कादायक! इटलीत कोरोनाचा तांडव; नवे ६१५३ संक्रमित सापडले, आतापर्यंत ८२०० मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 9:02 AM