वॉशिंग्टन - गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगातील अनेक देशांसह जगभरातील संशोधक सातत्याने संशोधन करत आहेत. दरम्यान, या संशोधनामधून काही धक्कादायक निष्कर्ष समोर येत आहेत. कोरोना विषाणू काही दिवसांमध्ये मानवी शरीरातील मेंदू, हृदय आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो. तसेच तिथे अनेक महिन्यांपर्यंत राहू शकतो, अशी माहिती संशोधनामधून समोर आली आहे. शरीर आणि मेंदूमधील या विषाणूच्या उपस्थितीबाबत अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक व्यापक संशोधन केले आहे.
यूएस नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, त्यांनी संशोधनामध्ये पाहिले की, हा विषाणू रेस्पेरेटरी सिस्टिमशिवायसुद्धा रोगजनक मानवी पेशींमध्ये रेप्लिकेटिंग म्हजणे प्रतिरूप बनवण्यात सक्षम आहे. या संशोधनाचे निष्कर्ष शनिवारी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आले. ते नेचर या नियतकालिकामध्ये छापले जातील.
हे संशोधन मेरीलँड येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ येथे करण्यात आले आहे. तिथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ४४ जणांच्या मृतदेहांच्या परीक्षणाशी संबंधित डाटाची सँपलिंग आणि रिसर्च करण्यात आला. संशोधकांच्या समुहाने या संशोधनामधून दावा केली की, SARS-Cov-2 RNA शरीराच्या अनेक भागांमध्ये, ज्यामध्ये मेंदूचे सर्व भाग समाविष्ट आहेत, अशाठिकाणी २३० दिवसांपर्यंत राहू शकतो. तसेच संसर्गाचे कारण ठरू शकतो.
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ रिसर्चच्या संशोधकांनी व्हायरल लेव्हल ओळखण्यासाठी विविध प्रकारच्या टिश्शू प्रझर्वेशन टेकनिकचा वापर केला. तसेच फुप्फुसे, हृदय आणि लहान आतड्यांमधून व्हायरसचे अनेक टिश्शू मिळवले आणि त्यावर संशोधन केले.या संशोधकांनी सांगितले की, आमच्या अध्ययनाच्या निष्कर्षांमधून हे समोर आले की, या विषाणूचा सर्वाधिक प्रभाव हा श्वसन नलिका आणि फुप्फुसांवर पडतो. तसेच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये संसर्गादरम्यान, विषाणूचा प्रसार हा शरीरातील इतर भागांमध्ये पोहोचू शकतो. यामध्ये मेंदूचाही समावेश आहे. संशोधकांनी सांगितले की, आम्हाला हा विचार करण्याची गरज आहे की, कोरोना विषाणू हा एख सिस्टमेटिक विषाणू आहे. त्याचा प्रभाव काही लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. मात्र काही लोकांच्या शरीरामध्ये तो दीर्घकाळापर्यंत राहू शकतो. तसेच त्रासाचे कारण ठरू शकतो.