तेहरान - आतापर्यंत १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसबद्दल अफवा देखील वाऱ्यासारख्या पसरत आहेत. अशाच अफवांमुळे इराणमध्ये २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसने ५ हजार लोक बाधित झाले आहे. इराणने व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्यासह सर्व प्रमुख सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव रद्द केले आहेत.आतापर्यंत चीनमधून पसरलेल्या या धोकादायक कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात एक लाखाहून अधिक लोक बाधित झाले आहेत, तर ३००० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावत आहे. त्यामुळे या भयानक व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इराणमध्ये अफवांचे पेव फुटले आहे. त्यातच इराणमध्ये दारू पिऊन कोरोनापासून बचाव होऊ शकतो अशी अफवा पसरली. इराणच्या वृत्तसंस्था ‘आयआरएनए’ च्या वृत्तानुसार, कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठो अफवा पसरल्यानंतर बर्याच जणांनी मिथेनॉल प्राशन केले. त्यामुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
coronavirus : ...म्हणून दुबईवरुन आल्यानंतर त्या दांपत्याचे विलगीकरण करण्यात आले नाही
जुंदीशापूर मेडिकल युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, २१८ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जास्त प्रमाणात मेथॅनॉल प्रश्न केल्याने डोळ्यांची दृष्टी कमी होणे, यकृतास नुकसान होण्याचा धोका असतो, त्यामुळे मृत्यू देखील होतो. यापूर्वी शनिवारी इराणच्या खासदार फतेमाह रहबर कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. फतेमाह या ५५ वर्षांचा होत्या.