लंडन - गेल्या दोन वर्षांपासून जगात कोरोनाची साथ सुरू आहे. या काळात कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशा लोकांना डायबिटिस झाला आहे. मात्र डायबिटिस हा सामान्य आजार आहे. तसेच कोविडबाबतही असेच म्हणता येईल. त्यामुळे एक आजार झाल्याने दुसराही होईल, असे नाही. मात्र ज्यांना कोरोना झाला आहे. त्यांच्यामध्ये डायबिटिस विकसित होण्याची शक्यता ज्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही त्यांच्या तुलनेत अधिक आहे किंवा नाही, हा शोधाचा विषय आहे. जर याचं उत्तर होकारार्थी असेल तर कोविड डायबिटीसचं कारण ठरतोय की, की काही अन्य आहे जे या दोघांना जोडत आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या संशोधनामधून समोर आले की, कोरोना होणे आणि डायबिटीस होण्यामध्ये एक संबंध आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ५ लाख पेक्षा अधिक लोक ज्यांना कोरोना झाला होता. त्याच्या रेकॉर्डच्या आधारवर अमेरिकन डेटामध्ये पाहिले की, या तरुणांना त्यांना संसर्ग झाल्यानंतर डायबिटिस होण्याची शक्यता होती. त्या लोकांच्या तुलनेत ज्यांना कोरोना झाला नव्हता आणि ज्यांना साथीच्या आधी श्वसनासंबंधीचा संसर्ग झाला होता.
तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या एका वर्गावर केल्या गेलेल्या एका अव्य अमेरिकन संशोधनामध्ये ४० लाखांपेक्षा अधिक रुग्णांच्या विश्लेषणामध्ये समान पॅटर्न मिळाला आहे. या प्रकरणी डायबिटिसची बहुतांश प्रकरणे टाइप २ होते. ८० लाखांहून अधिक रुग्णांच्या मेडिलक रेकॉर्डवर आधारित एक जर्मन अध्ययनामध्ये ज्यांना कोरोना झाला होता, त्यांना नंतर टाइप २ डायबिटिस होण्याची शक्यता अधिक होतीस, असे दिसून आले.
कोविड हा डायबिटिसचे कारण कसा काय ठरू शकतो, याबाबत अनेक सिद्धांत आहेत. मात्र त्यातील कुठलाही सिद्ध होऊ शकलेला नाही. विषाणूमुळे होणारा प्रदाह इन्शुलिन प्रतिरोधाचे कारण ठरू शकतो. ते टाइप २ डायबिटिसचं एक वैशिष्ट्य आहे. एक अन्य शक्यता म्हणजे एसीई२ शी संबंधित आहे. जे पेशींच्या पृष्टभागावर आढळणारे प्रोटिन आहे. जे सार्स-कोव्ह-२ शी संबंधित आहे.