स्पेन – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांवर संकट उभं राहिलं आहे. जगातील सर्वात सुंदर देश असलेला स्पेन याठिकाणीही कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या जाळ्यात अडकलेल्या २ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ३५ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी कोरोनामुळे जवळपास एका दिवसात ४६२ लोकांचा जीव घेतला आहे.
स्पेनमध्ये कोरोनाने इतकं भयंकर स्वरुप घेतले आहे की, अनेक घरांमध्ये मृतदेह पडले आहेत ते हटवण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. तसेच गंभीर आजारी असलेल्या वयोवृद्धांना बेवारस सोडण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या स्पेनची अवस्था गंभीर झाली आहे. चीन, इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ मार्चपासून स्पेनमध्ये पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सरकारकडून जसं जसं कोरोनाची संशयितांची तपासणी करत आहे तसे तसे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
स्पेनच्या सैन्यालाही घरांमध्ये बेवारस पडलेल्या मृतदेहांची माहिती घेण्याचं काम सोपवलं आहे. काही घरात अनेक दिवसांपासून मृतदेह पडून आहेत, परंतु कोरोनाच्या धास्तीने कुटुंबातील कोणीही घरात प्रवेश करण्यास तयार नाही. आता स्पेनचे सैनिक या घरात जाऊन मृतदेह उचलत आहेत. यांचा मृतदेह खरचं कोरोनामुळे झाला की यांची हत्या केली आहे याचीही चौकशी होणार आहे.
स्पेनचे सैन्य वृद्ध ठेवलेल्या असलेल्या केअर होमची तपासणी करीत आहे. मैड्रिड केअर होममध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. तर अल्कोयमध्ये 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप कुठेकुठे बेवारस मृतदेह सोडण्यात आलेत याची माहिती नाही. स्पेनचे संरक्षणमंत्री म्हणाले की, सैन्याच्या तपासणी दरम्यान असे अनेक वृद्ध आजारी असून जिवंत आढळले परंतु त्यांना त्यांच्या बेडवर बेवारस सोडण्यात आलं.
तसेच केअर होममध्ये पेन्शनधारकांना योग्य वागणूक दिली जात नाही. वृद्धांसाठी तयार केलेल्या केअर होमने त्यांची योग्य देखभाल केली नाही. जबाबदारांवर कडक कारवाई केली जाईल. यापूर्वी कासा डी कॉम्पोमध्ये केअर होममध्ये कोरोना विषाणूमुळे सामूहिक मृत्यूची नोंद झाली होती. २० टक्के वृद्धांमुळे केअर होम्समध्ये कोरोनाचा फैलाव होतो असं सांगण्यात येत असल्याचं संरक्षणमंत्री म्हणाले.