इस्लामाबादः जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अनेक देशांत लॉकडाऊनची परिस्थिती असून, 'शब-ए-बारातसाठी' मुस्लीम धर्मियांनी घराबाहेर पडू नये. तसेच शब-ए-बारातची नमाज मशिदीतदेखील अदा करू नये, असे आवाहन मुस्लिम बांधवांना करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासीयांना एक संदेश लिहिला होता.ट्विटमध्ये ते लिहितात, मी जगभरातील मुस्लिमांना विनंती करतो की, आज रात्री शब-ए-बारातनिमित्त खासकरून नाफिल नमाजनिमित्त अल्लाहची प्रार्थना करावी आणि त्यांच्याकडे क्षमा आणि आशीर्वाद घ्यावेत. ' मात्र, ट्रोल झाल्यावर त्यांनी ते ट्विट एका तासात हटवले आहे. गुरुवारी पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 248 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यासह संक्रमित कोरोनाची संख्या 4,322 वर गेली आहे. दोन आठवड्यांच्या लॉकडाऊननंतरही अनेकांना विषाणूचा प्रसार लवकर थांबविण्यात अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाच्या मते, या संसर्गामुळे देशात आतापर्यंत 63 लोकांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू एका दिवसात झाला आहे. आतापर्यंत एकूण 572 लोक कोरोनातून बरे झाले असून, 31 लोकांची प्रकृती गंभीर आहे.
Coronavirus: 'त्यांनी' अल्लाहची माफी मागावी; ट्रोल झाल्यानंतर इम्रान खान यांच्याकडून ट्विट डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 5:34 PM