मास्को – संपूर्ण जगावर सध्या कोरोना विषाणूचं संकट पसरलं आहे. जगातील १९० हून अधिक देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. बहुतांश देशांनी कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु केले आहे. हजारोंच्या संख्येने लोक कोरोनामुळे मरत आहेत. आतापर्यंत २७ लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ लाख ९० हजारांहून जास्त मृत्यू झाले आहेत.
चीनच्या या वुहान शहरातून हा व्हायरसच्या जगाच्या अन्य देशात पसरला. यावरुन अमेरिका आणि चीन यांच्यात तणावही निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरसला अमेरिकेने चीनी व्हायरस म्हणत कोरोना पसरवण्यासाठी चीन जबाबदार आहे त्यांना एकदा हे सत्य जगाला सांगावे लागेल असं अमेरिकेने सांगितले आहे. यानंतर आता रशियामधील सुप्रसिद्ध मायक्रोबायोलॉजिस्टने असा दावा केला आहे की वुहान वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या आत "वेडेपणाचा प्रयोग" सुरु होता. या प्रयोगांचा परिणाम म्हणजे कोरोना व्हायरस आहे.
तसेच वुहानमधील चिनी शास्त्रज्ञ व्हायरसच्या रोगास कारणीभूत असलेल्या क्षमतेची तपासणी करीत होते. त्यांचा हेतू वाईट नव्हता पण या प्राणघातक विषाणूला जाणूनबुजून चीने जन्म दिला असा दावा विश्वविख्यात प्राध्यापक पीटर चुमाकोव्ह यांनी केला आहे. मास्को येथील एका संस्थेतील संशोधक प्रोफेसर चुमकाव यांनी सांगितले की, चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत वैज्ञानिक गेल्या १० वर्षापासून विविध प्रकारे कोरोना व्हायरस विकसित करण्याचा प्रयत्न करत होते. चिनी शास्त्रज्ञांनी हा रोग तयार करण्यासाठी नव्हे तर रोग तयार करण्याची क्षमता पाहण्यासाठी हे केले असावे अशी शक्यता आहे.
मला असं वाटतं की, चिनी शास्त्रज्ञांनी वेडा प्रयोग केला. उदाहरणार्थ, त्यांनी जीनोम घातला ज्यामध्ये विषाणूने मानवी पेशींना संक्रमित करण्याची क्षमता प्राप्त केली. आता या सर्वांचे विश्लेषण केले जात आहे. सध्याच्या कोरोना विषाणूचा जन्म झाल्याचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे असंही प्रोफेसर चुमकाव यांनी सांगितले.
मास्को येथील दैनिकाला मुलाखत देताना चुमकाव म्हणाले की, विषाणूच्या आत अनेक गोष्टी घातल्या गेल्या आहेत ज्याने जीनोमचा नैसर्गिक क्रम बदलला आहे. या कारणास्तव, कोरोना विषाणूच्या आत खूप खास गोष्टी आल्या आहेत. या विषाणूमागची कहाणी लोकांपर्यंत हळू हळू येत आहे याचं मला आश्चर्य वाटते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. आता या व्हायरसला जबाबदार कोण हे ठरवणं योग्य नाही. चिनी वैज्ञानिक एचआयव्हीची लस तयार करण्यासाठी विषाणूचे वेगवेगळे प्रकार बनवत होते आणि त्यांचा हेतू चुकीचा नव्हता असंही चुमकाव यांनी सांगितले.
आणखी वाचा...
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात
कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी बळी जाण्याची भीती